Home Breaking News ~~*परिवर्तन मंचाची स्थापना*~~

~~*परिवर्तन मंचाची स्थापना*~~

नामदेव  बोमनवाड मुखेड तालुका प्रतिनिधी नांदेड

मुखेड तालुक्यातील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांची बैठक दि.२/१०/२०२२ म. गांधी जयंतीच्या दिवशी मुखेड येथे संपन्न झाली. मुखेड तालुक्याचे मागासले पण राजकीय परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची भूमिका या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. या विषयाचे प्रास्ताविक करताना मा. टी. व्ही. सोनटक्के सरांनी विचार मांडले की मुखेड तालुका हा स्वतंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही आर्थिक सामाजिक राजकीय दृष्ट्या मागासलेलाच आहे सध्या स्थिती फार भयानक आहे लोकशाहीचा लिलाव पैसेवाले लोक करत आहेत. देशाची भावी तरुण पिढी आणि नागरिक यांचा उपयोग राजकारणी लोक करून घेत आहेत. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते निराश होत आहेत. अशा परिस्थितीत परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी आणि जाणकार नागरिकांनी गप्प बसून चालणार नाही लोकांमध्ये विचाराचे परिवर्तन घडवून आणण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मुखेड तालुका केंद्रस्थानी मानून या तालुक्यांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी मागासलेपणाचे किंवा विकासाचे कारण राजकारणातच असते, आपण कोणत्याही पक्ष संघटना याची किंवा चळवळीतील असो सर्वांनी एकत्र येऊन मुखेड तालुक्याचे मागासले पण कसे दूर करता येईल हा ध्यास बाळगून आपण संघटित होऊन काम केले पाहिजे.
सामाजिक कार्यकर्ते मा. दत्ता तुमवाड यांनी मुखेड तालुक्याच्या मागासले पण आणि आर्थिक, सामाजिक, राजकीय विश्लेषण करताना कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. असे सांगितले बैठकीमध्ये मा. मस्कले मा. सर संजय भारदे मा. पंडित पाटील मा. नगरसेवक विनोद आडेपवार मा. नामदेव गवलवाड मा. हेळगिरे सर मा. ज्ञानेश्वर डोईजड मा. संभाजी लवटे मा. बालाजी बाबळे मा‌. मेहताब शेख मा. बालाजी वारे मा. जाधव सर मा. सूर्यकांत अलटवाड मा. शंकर पवार मा. मोतीराम पवार मा. राजकुंटवार इ. कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेतला.
मुखेड तालुका परिवर्तन आणि विकासाचे मॉडेल म्हणून झाला पाहिजे हा संकल्प सर्वानुमते करण्यात आला.
परिवर्तन मंच मुखेड तालुका या बॅनरखाली सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त करून मंचाचा १) कार्यक्रम मतदार जागृती अभियान घेण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
या बैठकीला तालुक्यातील सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यकर्त्यांचा तालुक्यातील सर्व भागातून कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीचे अध्यक्ष मा. दत्ता तुमवाड तसेच मंचाचे निमंत्रक मा. टी. व्ही. सोनटक्के सर आणि सर्व सहभागी कार्यकर्त्यांचे आभार मा नामदेव बोमनवाड यांनी मानले.

Previous articleशेतकऱ्यांच्या पदरी शेवटी निराशा !
Next articleहिमायतनगर तालुक्यातील 0 ते 20 पटसंख्या असलेल्या 18 जिल्हा परिषद शाळा होणार बंद !