👉 थेट बांधावरून….
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 04 सप्टेंबर 2022
माणुस हा शेवटी आशेवरच जगणारा प्राणी… भरपुर पाऊस..कधी पावसाचा खंड, जंगली प्राणी यांचा त्रास, वानर, जगंली डुक्कर, तर….कधी एखाद्या पावसाची हुलकावणी…हा सारा प्रवास सुरू होतोय. शेतकरी या चार अक्षरी शब्दांचा….
केवळ एकाच पावहाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या कापसाची आजतागायत अवस्था ही शेतक-यांना आसमानी संकटांनी ग्रासलेले आहे.
शासनाचे अनुदान चेक आता कुठे तालुक्यातील तहसीलदार यांना मोठ्या थाटामाटात तालुक्यातील लोकनेत्यांनी दिले आहेत. पण …. अगोदरच डबघाईस आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक हि बाराही महिने दलालावर चालते. त्याचा त्रास तालुक्यातील शेतकऱ्यांना होतो. यांचाही अगोदर बंदोबस्त करण्यात यावा. हि हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे.