Home Breaking News *हिंदी माध्यमिक विद्यालयात भव्य पालक मेळावा संपन्न*

*हिंदी माध्यमिक विद्यालयात भव्य पालक मेळावा संपन्न*

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

के व्हि एन नाईक शिक्षण संस्थेच्या सिडको शैक्षणिक संकुलात हिंदी ।माध्यमिक विद्यालयात आज पालक-शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते यावेळी महिला पालकांची संख्या लक्षणिय होती
आजच्या पालक मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे *प्राचार्य श्री प्रदिप सांगळे सर* होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे *शिक्षणाधिकारी श्री मोहन चकोर सर* होते प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा थोरे पर्यवेक्षक श्री अनिल ताडगे व्यासपीठावर उपस्थित होते
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री चंद्रप्रकाश यादव सर यांनी विद्यालयात वर्षभर राबविले जाणारे विविध उपक्रम याची माहिती पालकांना सांगितली त्यात वर्षभर घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा,जादा तासिका,क्रीडा स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन,बाह्य परीक्षा ,संगणक शिक्षण याबाबत माहिती दिली संस्थेचे शिक्षणाधिकारी श्री मोहन चकोर सर यांनी पालकांना विद्यार्थी शिस्तीचे महत्व सांगितले विद्यार्थी नियमित उपस्थितीत राहण्याबाबत अहवान केले
पालकांच्या वतीने ऍड गुप्ता यांनी शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व विद्यालयाचे व शिक्षकांचे अभिनंदन केले
यानंतर पालक-शिक्षक संघाच्या पदाधिकारी यांची निवड करण्यात आली
यानंतर आजच्या मेळाव्याचे अध्यक्ष व विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रदिप सांगळे यांनी मार्गदर्शन केले बरेचसे पालक जेव्हा आपल्या राज्यात काही कामानिमित्त जातात तेव्हा 2/3 महिने आपल्या पाल्याला घेऊन जातात तेव्हा त्याचे शैक्षणिक नुकसान होते तरी यापुढे याबाबत खबरदारी घेण्याचे अहवान केले तसेच जे विद्यार्थी विविध खाजगी वाहनाद्वारे विद्यालयात येतात तेव्हा याबाबत कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले
यासभेचे सूत्रसंचालन श्री के पी कापडी सर यांनी केले तर आभार श्री उमेश भाबड सर यांनी मानले
*सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.

Previous articleमातंग समाजाने शैक्षणिक प्रगती सोबतच आर्थिक विकासाकडे लक्ष द्यावे:-संताराम तायडे
Next articleपांगरा गाव विकास कामात सदा अग्रेसर!