Home Breaking News मृत जनावरे रस्त्यांत टाकल्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा होतोय त्रास.

मृत जनावरे रस्त्यांत टाकल्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा होतोय त्रास.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 03 सप्टेंबर 2022

हिमायतनगरहुन ग्रामीण भागातील खेड्याकडे जात असतांना मृत झालेली जनावरे रस्त्याच्या कडेला टाकली आहेत. या मृत जनावरांच्या शरीरावर अळ्या पडल्या असुन, सुटलेल्या दुर्गंधीचा त्रास ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थीयांना होत आहे.
या मृत जनावरांमुळे वातावरणात प्रदुषित होत असुन, आजुबाजुला शेती असलेल्या शेतकरी, महिला मजुर भगिनींना व येणा-या जाणा-या शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य प्रचंड धोक्यात आले आहे. सदरील रोडवरुन प्रवास करीत असलेली व्यक्ती नाका, तोंडावर हातरुमाल घट्ट बांधुन प्रवास करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
हि मृत झालेली जनावरे कोणी रस्त्यावर टाकली यांचा शोध घेऊन संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Previous articleशेतकऱ्यांची सतत सेवा करुन लोकप्रियता मिळविणारे टारफे.. कर्तव्यदक्ष अधिकारी होते.
Next articleमातंग समाजाने शैक्षणिक प्रगती सोबतच आर्थिक विकासाकडे लक्ष द्यावे:-संताराम तायडे