Home Breaking News संभापूर येथील जि.प.शाळेत शालेय साहित्य वाटप.

संभापूर येथील जि.प.शाळेत शालेय साहित्य वाटप.

नामदेवराव तायडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप..!

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी

संभापूर:- रूढी परंपरांना फाटा देत खामगाव -तालुक्यातील संभापूर येथील डॉ.राजेश तायडे यांनी स्व.नामदेवराव सुखदेवराव तायडे यांच्या स्मृतिदिनाचा खर्च टाळून जि.प.उ.माध्यमिक शाळा संभापूर येथे शालेय साहित्याचे वाटप केले, शालेय उपयोगी वही,पेन असे ९२ विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. जि.प.शाळेच्या वतीने कार्यक्रमाच्या वेळी डॉ राजेश तायडे यांचे फुलगच्छ देवून स्वागत करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक गोपनारायन सर, डॉ.निंबाळकर सर, डॉ.मिलींद तिडके सर, कराळे सर,सौ.सोळंके मॅडम,सौ.तेलगोटे मॅडम,मंगलसिंग इंगळे, गौतम तायडे, भैय्या पवार, संदिप इंगळे, रामराव अंभोरे,संघपाल तायडे, निलेश तायडे, सुशीलकुमार तायडे आदी उपस्थित होते

Previous articleराज्यात पदवीधर, शिक्षक निवडणुकीचा बिगुल वाजला
Next articleसंभापूर येथे जि.प.शाळेत माहिती अधिकार दिन साजरा..!