Home Breaking News राज्यात पदवीधर, शिक्षक निवडणुकीचा बिगुल वाजला

राज्यात पदवीधर, शिक्षक निवडणुकीचा बिगुल वाजला

पदवीधर : नाशिक, अमरावती,
शिक्षक : औरंगाबाद, नागपूर, कोकण

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

नाशिक, अमरावती विभागात होणाऱ्या पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण मतदारसंघातील शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचा बिगुल सोमवारी ( 26 संप्टेबर ) वाजला.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रपरिषदेत ही घोषणा केली. येत्या 1 ते 7 नोव्हेबर दरम्यान अर्ज करता येईल, प्रारूप यादी 23 नोव्हेबर रोजी जाहीर होईल.
देशपांडे म्हणाले की, या निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरसाठी 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी किमान 3 वर्ष आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत.1 नोव्हेंबर 2022 रोजीच्या लगतच्या 6 वर्षातील 3 वर्ष शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. या मतदार संघासाठी अर्ज क्र.19 भरून मतदार नोंदणी करू शकतात. दोन्ही मतदार संघासाठी चे अर्ज सम्बंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयात तसेच मुख्य निवडणू क अधिकारी यांच्या https// ceo. maharashtra. gov. in / Downloadforms / Form – 19 pdf या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

प्रतिक्रिया -:

हेमंत शिंदे ( पदवीधर मतदार )

2017 साली पदवीधर मतदार संघा साठीच्या निवडणुकी वेळी बनावट नाव मतदार यादीत समाविष्ठ असल्याचे कारण देत शासनाने नवीन पदवीधर नोंदणी केली होती. या वेळेस सुद्धा नव्याने नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करण्यास लावुन जुन्या पदवीधरांना का वेठी स धरण्यात येत आहे हा मोठा प्रश्न आहे.
तरी नवीन पदवीधर मतदार नोंदणी करताना जुन्या 2017 साली मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांना वगळावे ही शासनाला विनंती आहे.

Previous articleदरोडा करणा-या सराईत पाच गुन्हेगाराना ठोकल्या बेडया.
Next articleसंभापूर येथील जि.प.शाळेत शालेय साहित्य वाटप.