कृष्णा घाटोळ
भूमीराजा शहर प्रतिनिधि बाळापुर
शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री बाळादेवी मातेच्या मंदीरात नवरात्र उत्सवास सुरूवात अश्विन शुद्ध प्रतिपदेला श्री.बाळादेवी मातेच्या नवरात्रोत्सवास सुरूवात झाली आहे.श्री घटस्थापनेच्या शुभ पर्वावर मंदीरामध्ये मंगल वाद्दयाच्या गजरात घटस्थापना होऊ नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. श्री.भगवती बाळादेवी मातेच्या नावावरून या ऎतिहासीक शहराला बाळापुर हे नाव पडले आहे .हे प्राचिन मंदीर ऎतिहासीक नगराच्या पुर्वीपासुन एका उंच टेकडीवर वसलेले आहे . भगवती श्री.बाळादेवी मातेचा विग्रह स्वयंभु आहे .या पवित्र स्थळी श्री समर्थ रामदास स्वामीनी काही दिवस वास्तव केल्याचा उल्लेख ही आहे .बाळापुर शहराच्या दक्षिण बाजुला श्री मन व महेश नद्या उतरवाहीणी वाहतात ,दोन्ही नद्यांच्या मध्यभागी उंच अशा श्री बाळादेवी मातेचे मंदीर वसलेले आहे . श्री. बाळादेवी देवस्थान एक जागृत शक्तिपीठ म्हणुन प्रसीद्ध आहे .टेकडीच्या दक्षिण टोकावर प्राचीन महात्म्यांची समाधी आहे.आपली 18 महापुराण त्यापैकी ब्रम्हांड महापुराण ,त्या पुराणात श्री.ललीतो पाठ्यान आहे.त्यातील 22 व्या अध्यायात श्री.भगवती बाळादेवी मातेने भंडासुर नामक दैत्याचा 30 पुत्राचा वध केल्याची कथा आहे .टिवीवर जाहिरातीमध्ये श्री यंत्राची महती दाखविली जाते.त्या श्री. यंत्राची देवता श्री भगवती बाळादेवी माताच आहे.या यंत्राची उपासना म्हणजे श्री.भगवती बाळादेवी मातेची उपासना आहे.या कलियुगात सर्वश्रेष्ठ तथा शिघ्र कल देणारी अशी ही एकच उपासना आहे. नवरात्रोत्सवास दि.05 ऑक्टोबर दशमीला श्री.भगवती बाळादेवी मातेची पालखी सायंकाळी 5 वाजता शिमोलंघनास जाईल.नवरात्रोसवाच्या दरम्यात त्रीकाल आरती दररोज होईल.