Home Breaking News हिमायतनगर तालुक्यात लंपी स्किन रोगाबद्दल लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे.

हिमायतनगर तालुक्यात लंपी स्किन रोगाबद्दल लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे.

तालुक्यात लंपी रोगाने प्रादुर्भाव झालेले जनावर नाही व लंपीमुळे एकही पशुचा मृत्यू नाही – पशुवैद्यकीय डॉ. यू. बी. सोनटक्के

हिमायतनगर /- कृष्णा राठोड
तालुक्यामध्ये लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता मागील काही महिन्यापासून पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती हिमायतनगर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सायपरमेथ्रीन चे वाटप गोमाशा नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात आला. करंजी येथे लंपी स्किन चा पहिला रुग्ण (गाय )आढळली नंतर सदर गाईचे नमुने प्रयोगशाळेस पाठवण्यात आले आहे. तसेच पशुसंवर्धन विभागा मार्फत करंजी पासून पाच किलो मीटर अंतरात येणाऱ्या सर्व गावांमध्ये लसीकरण करून घेण्यात आले आहे. पवना, पोटा,दुधड, सोनारी, जवळगाव येथील जनावरांमध्ये लसीकरण प्राधान्यने करण्यात आलेले असून आजारी गाई वर उपचार करण्यात आले आहे व गाईमध्ये सुधारणा असून बरी झाली आहे.

सध्या तालुक्यामध्ये लंपी स्किन चा प्रादुर्भाव असलेला एकही जनावर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. पण वेळीच लसीकरण करून आपल्या जनावरांना रोगापासून वाचवण्याकरता पशुसंवर्धन विभाग युद्धपातळीवर लसीकरण करत आहे.

मागील तीन दिवसा मध्ये करंजी घारापूर,रमणवाडी गणेशवाडी, कारला,सिलोडा, कामारी, पवना, सवना, एकम्बा, सिरजनी, कोठा, कोठा ता., टाकराला, जिरोना, म्हदापूर, चीचोडी, मंगळूर, बोरगडी धानोरा, वारंगटाकली, खेरगाव गावांमध्ये लसीकरण झाले असून आजपर्यंत 7800 व देवकृपा गौशाळा पवना येथील 400 जनावरांमध्ये लसीकरण झाले आहे. रोज 5000 जनावरांमध्ये लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेऊन पशुसंवर्धन विभाग युद्धपातळीवर लसीकरण करत आहे.

पुढील दोन-तीन दिवसांमध्ये हिमायतनगर तालुक्यातील सर्व गोवंशाची जनावरांमध्ये लसीकरण करण्याचा मानस पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती हिमायतनगर यांचे असून त्या दृष्टीने सर्व प्रशासन कार्यान्वित आहे असे डॉ. यू. बी.सोनटक्के, पशुधन विकास अधिकारी,पशुसंवर्धन विभाग हिमायतनगर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

Previous article*जनावरांचे लंपी रोगाचे लसीकरण हिमायनगर तालुक्यातले खडकी (बाजार)*
Next article*हिमायतनगर तालुक्यात राजकीय भुकंप होणार का…..*