मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23 सप्टेंबर 2022
संबंध राज्यभरात सध्या जनावरांना लंपी आजाराने ग्रासले आहे. आपल्या पशुधनाला या आजारांचा कुठलाही त्रास होऊ नये, म्हणून हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. या गावी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी हिमायतनगर डॉ. सोनटक्के साहेब आणि त्यांच्या कर्मचारी यांनी 190 ते 200 जनावरांचे लसीकरणाचा डोस दिला आहे. या लसीकरण मोहीमेला सवना येथील सर्व शेतकरी बांधवांनी छान प्रतिसाद दिला आहे. लंपी आजाराने त्रस्त असलेली जनावरांच्या अंगावर गुद्दया दिसतात. जनावर चारा घात नाही. असे जाणकार शेतकरी सांगत होते. गावात गतवर्षी 77 बैलजोडी होती. यावर्षी 67 बैलजोड्या आहेत. दिवसेनदिवस बैल बाळगण्याचे प्रमाण कमी होते आहे. असेही सवना येथील शेतकरी सांगत आहेत. म्हैसी बाळगण्याचे प्रमाण खुपच कमी झाले आहे. गायी काही ठराविक शेतकरी बाळगत आहेत. असेही शेतकरी सांगत होते.
यावेळी स्वतः कर्तव्यदक्ष तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनटक्के साहेब हजर होते. त्यांच्या कर्मचारी यांनी जनावरांचे लसीकरण करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.
गावातील सर्व शेतकरी बांधव आणि सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, माजी पोलीस पाटील व उपस्थित नागरिकांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.