Home Breaking News संभापूर येथे जनावरांवर आलेल्या लंपी रोगाची प्रतिबंधक लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण..!

संभापूर येथे जनावरांवर आलेल्या लंपी रोगाची प्रतिबंधक लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण..!

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी ७७०९७५९८३६

संभापूर:-जनावरांमध्ये लंम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय पातळीवरुन यावर उपायायोजना केल्या जात आहेत.खामगाव -तालुक्यातील संभापूर गट ग्रामपंचायतीकडून जनावरांवर आलेल्या लंपी या आजाराची प्रतिबंधक लसीकरण मोहीम ग्रामपंचायत चे सरपंच
ज्योतीताई पवार यांच्या सहकार्याने आणि सर्व शेतकरी बांधवांच्या सहकार्याने पुर्ण झाली.लंपी हा रोग संसर्गजन्य असून एका आजारग्रस्त गाय किंवा बैलाला मच्छर चावले , गोचीड चावले, किंवा मोठ्या माशा चावल्या आणि तेच दुसऱ्या जनावरांना चावले तर हा आजार पसरतो . पोटच्या लेकरासारखे वाढवविलेले लाखों रूपयांचे पशुधन धोक्यात आले आहे. या रोगाला प्रतिबंध म्हणून ग्रामपंचायतने लसीकरण मोहीम राबवून या भयावह रोगाला आळा बसेल अशी आशा गावकऱ्यांमध्ये आहे.

Previous article– – – तर नाशिक शहरातील कलाकारांचा चित्रपट महामंडळ निवडणुकीवर बहिष्कार
Next articleटीईटी घोटाळयातील शिक्षकांना मासिक वेतन द्या, पगारवाढ देऊ नका : हायकोर्ट