Home Breaking News वाशी तांडा येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकास दिले...

वाशी तांडा येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकास दिले निवेदन……!

हिमायतनगर/- कृष्णा राठोड

तालुक्यातील वाशी वाशी तांडा येथे खुले आम चालू असलेली अवैध गावठी. देशी दारू बंद करा या मागणीचे निवेदन आज हिमायतनगर पोलीस निरीक्षक बि. डी. भुसणुर यांना देण्यात आले आहे निवेदनात वाशी तांडा येथे अनेक लोकांनी गावांमध्ये अवैधरीत्या दारू भट्टी चालवून घरगुती दुकाने थाटून गावातील नागरिकांना व महिलांना व तसेच मुला मुलींना त्रास देत आहेत निर्व्यसनी मुलांना तसेच नागरिकांना व्यसन लावून आरोग्य आणि आयुष्य बरबाद करत आहेत गावातील काही रहिवाशांना नाहक त्रास होत असून रात्री बे रात्री दारू पिणारे लोक हे गावातील सुजाण नागरिकांना विनाकारण त्रास देत असल्याने येथील सुरू असलेल्या अवैध दारू बंद करा अशा मागणीचे निवेदन यापूर्वीसुद्धा हिमायतनगर पोलीस स्टेशनला गावातील महिलांनी दिले होता त्यावेळेस काही दिवस दारू बंद झाली होती पण आता भरपूर प्रमाणात वाशी येथे दारूचा महापूर चालू आहे त्यामुळे गावातील नागरिक महिला व मुले मुले मुली त्रस्त होत असल्याने निवेदनाची तात्काळ दखल घेऊन अवैध सुरू असलेली दारू बंद करा अशा मागणीचे निवेदन हिमायतनगर पोलीस स्टेशन ला देण्यात आले आहे.
निवेदनावर सरपंच गुलाब राठोड उपसरपंच धरतरीनाथ डवरे, आनंदराव मोरे, नामदेव मोरे ,अर्जुन जाधव ,संदीप राठोड, अनिल जाधव , दीपक आडे, गजानन राठोड यासह स्वाक्षऱ्या केली असून निवेदन देताना वासी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleहिमायतनगर रेल्वेस्थानकांची दुरावस्था. प्रवासांचे हाल!
Next article– – – तर नाशिक शहरातील कलाकारांचा चित्रपट महामंडळ निवडणुकीवर बहिष्कार