पोलीस स्टेशन हिमायतनगर चे पोलिस उपनिरीक्षक बी.जी. महाजन, माजी सैनिक थोटे साहेब यांची प्रमुख उपस्थिती…
हिमायतनगर /- कृष्णा राठोड
तालुक्यातील गुरुकुल इंग्लिश स्कूल शाळेत आज मराठवाडा मुक्ति संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
माझी सैनिक थोटे साहेब, हिमायतनगर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक बी.जी महाजन साहेब ध्वजारोहणाचा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
उपस्थित मान्यवरांनी स्वामी रामानंद तीर्थ व हुतात्मा जयंतराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून माजी सैनिक थोटे साहेब, व शाळेचे सचिव डॉ.मनोहर राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिना विषयी भाषांनातून, सामूहिक गीत गायनातून मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यामध्ये इंग्रजांविरुद्ध दिलेला लढा, वीरमरण पत्करणार्या हुतात्माच्या जीवन चरित्रवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले.
आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७रोजी स्वतंत्र झाला पण खर्या अर्थाने आपल्याला १७ सप्टेंबर १९४८ ला स्वतंत्र मिळाले आहे.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी आपण १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनला.
ही निजामकालीन सत्ता संपवण्यासाठी थोर हुतात्मे स्वामी रामानंद तीर्थ, हुतात्मा जयंतराव पाटील अशा अनेक थोर हुतात्मे आपल्या जिवाची पर्वा न करता रझाककाराशी लढून आपल्याला स्वातंत्र प्राप्त करून दिला आहे असे माजी सैनिक थोटे साहेब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना, पालकांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना विषयी सखोल अशी माहिती दिली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन जाधव सर व आभार प्रदर्शन शाळेचे प्रिन्सिपल प्रफुलजी भोसले यांनी केले.
यावेळी उपस्थित शाळेचे सचिव तथा कार्यवाह डॉ. मनोहर राठोड, प्रिन्सिपल प्रफुलजी भोसले, सचिन खिल्लारे, सहशिक्षक भाटे सर,पवार सर, पंगणवाड सर, व्ही.जाधव सर, जी.जाधव सर, गुंडेकर सर, शितळे सर, आर.के राठोड सर, राठोड मॅडम, स्टेला मॅडम, आडे मॅडम ,गिरी मॅडम यासह शाळेतील सर्व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.