Home Breaking News दूरशिक्षण व ऑनलाइन पदवीस पारंपरिक दर्जा

दूरशिक्षण व ऑनलाइन पदवीस पारंपरिक दर्जा

युजीसी ने काढले परिपत्रक,

मागासलेल्या आर्थिक दुर्बल घटकांना खूप मोठा दिलासा

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

दूरशिक्षण आणि ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या पदवीला आता पारंपरिक पदवी समकक्ष दर्जा असेल. तसे परिपत्रक यूजीसीने जाहीर केले आहे. त्यामुळे ऑनलाइन पदवी घेण्यासह दूरशिक्षनाच्या विद्यार्थीना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना काळात ऑनलाइन आणि दूरशिक्षणाकड़े वळण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता, परंतु या पदवीला विशेष महत्व दिले जात नसल्याचा समज असल्याने नौकरीसाठी अडचणी वाढण्याच्या शक्यतेने विद्यार्थीकडून काहीशी नाराजी व्यक्त केली जात आहे.आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी ) ने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दूरशिक्षणातून मिळालेली पदवी, ऑनलाइन, ऑनलाइन शिक्षण पू र्तीनंतर प्राप्त पदवी समकक्ष असेल, असे परिपत्रक यूजीसी चे सचिव रजनीश जैन यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे दूरशिक्षण आणि ऑनलाइन शिक्षणातुन पदवुत्तर पदवी, पदवी पदविका या अभ्यासक्रमांना मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
मात्र अभियांत्रिकी, वैधकीय, फिजिओ, थेरपी, नर्सिंग आदि अभ्यासक्रमाचा यात समावेश नसेल. त्यांची यादी विद्यापीठाने आपल्या संकेत स्थळावर यापूर्वीच प्रसिद्ध केली आहे.

प्रतिक्रिया -: हेमंत शिंदे( नाशिक जिल्हा संघटक )अखिल भारतीय ओबीसी महासभा

“अत्यंत महत्वपुर्ण व मागासवर्ग व आर्थिक दुर्बल घटकांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे. या बद्दल युजीसी चे खुप खुप अभिनंदन. कारण शासनाने ओबीसीची शिष्यवृर्ती बंद केल्यामुळे विद्यार्थीना रेगुलर महा विद्यालयाची मोठी प्रवेश फीस भरणे जिकरीचे झाले आहे. त्या मानाने मुक्त विद्यापीठ व ऑनलाइन पदवीच्या फीस मध्ये सौम्य रक्कम आकारली जाते. परंतु दूरशिक्षण व ऑनलाइन पदवी च्या संदर्भ बाबतीत जो गैरसमज होता तो युजीसी ने परिपत्रक काढून कायदयाने दुर केला आहे.”

Previous articleहळद उत्पादक शेतकरी हुमणी आळी रोगाच्या संकटात….
Next article२०१७ नंतर संस्थाचालकांनी नेमलेल्या शिक्षकांना मान्यता द्या