Home Breaking News हळद उत्पादक शेतकरी हुमणी आळी रोगाच्या संकटात….

हळद उत्पादक शेतकरी हुमणी आळी रोगाच्या संकटात….

अंगद सुरोशे
हिमायतनगर/ प्रतिनीधी
हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे कापुस या पिकावर निर्धारीत असतांना गेल्या काही वर्षा पासुन हळद या पिकाची जास्त प्रमाणावर लागवड करतांना पाहावयास मिळत आहेत हळद हे पीक आठ ते नऊ महिण्याच्या कालावधीचे असल्याने या पिकासाठी अधिकच म्हणत करावी लागते पण दोन ते तीन वर्षा पासुन हळदिला जेमतेम भाव राहत असल्याने येथील शेतकरी मात्र हतबल होत आहेत पण याया वर्षी तालुक्यात 50% शेतकर्यांनी हळद लागवड केली दर वर्षीच्या सरासरीत कापसाचा पेरा कमी असल्याने कापसाला चांगलाच भाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात असतांनाच व तसेच हळदीवर आलेल्या हुमणी आळी रोगाच्या हाहाकारामुळे कापुस हसला हळद रुसली आशी चर्चा मात्र शेतकर्यातुन होत आहे. शासनाने विमा कंपनी मार्फत कापुस, सोयाबीन, मुग, उडीद, या पिकासाठी पिक विमा भरुन घेतला पण हळद या पिकावर कोणताही निर्णय शासनाने आध्याप घेतला नसल्याने शेतकर्यांची नाराजी असल्याचे चित्र आहे. लवकरच हळद पिकाला शासनाकडुन मदत देण्यात यावी अशी तालुक्यातील शेतकर्यांनी मागणी केली आहे.

 

Previous articleगोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा नेता……..बाबुराव कदम कोहळीकर
Next articleदूरशिक्षण व ऑनलाइन पदवीस पारंपरिक दर्जा