अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव
संभापूर:-नळाद्वारे येणारे पाणी अत्यंत दूषित येत असल्याची नागरिकांमधून ओरड सुरु आहे. अनेक गंभीर आजार दूषित पाणी पिण्याने होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी एकप्रकारे खेळ सुरु असल्याच्या भावना गाववासियांमधून व्यक्त होत आहे.ग्रामपंचायत रोगराईच्या या काळात गाव स्वच्छ ठेवण्याऐवजी गावात दूषित पाणी पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे.सताड उघड्या असलेल्या नाल्या, त्यात साचलेली घाण, डुकरांचा मुक्त संचार, गल्ली मोहल्ल्यात व रस्त्यांच्या कडेला पडून असलेला केरकचरा आजारांना आमंत्रण देत असून अस्वच्छतेमुळे आजार आणखीच बळावत आहेत.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत, दुषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरतात.दुषित पाणी प्यायला जातं. त्यामुळे आजारांना सामोरे जावे लागतं.नागरीकांना शुद्ध व मुबलक पाणी देण्याची ग्रामपंचायतची जबाबदारी असतांना दुषित पाणी पुरवठा केला जात आहे. लिकेज पाईप लाईनमुळे गावात दुषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.संबधीतांचे याकडे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. गावातील घान सांडपाणी नळाद्वारे येत असून यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.