त्यांचा अंत्य संस्कार बुध्द भूमि शिर्ला, येथे दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी सायं. 6 वाजता करण्यात आला आहे. त्यांच्या स्मृती स विनम्र आदरांजली,,,,,
,भंन्ते अश्वजित हे भुसावळ येथे वर्षावास साठी असतांना त्यांची अचानक तब्येत बिघडली त्यांना ताबडतोब रूग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले परंतु शरीराने साथ दिली नाही, रात्री 11 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली,भन्ते अश्वजित हे वृत्तरत्न सम्राट मधून आणि अन्य साप्ताहिक, मासिक मधून सातत्याने लिखाण करत होते, धम्मावर त्यांचे अनेक लेख प्रकाशित आहेत, त्यांची दोन पुस्तक प्रकाशित आहेत,1) चरथ भिक्खवे चारीक,2)धम्म सागरातील शंखशिंपले, ही दोन्ही पुस्तक रमाई प्रकाशन, औरंगाबाद ने प्रकाशित केली होती,दुसरे पुस्तक दोन महिन्या पूर्वीच औरंगाबाद ला प्रकाशन सोहळा झाला होता, भन्ते अश्वजित यांची ओळख म्हणजे धम्म फळ्यावर लिहून समजावणे, मुलांना शाळेसारख शिकवले, संस्कार केले, प्रश्न उत्तर च्या माध्यमातून शिकवले, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी 32 गाव शहर इत्यादी ठिकाणी राहून त्यांनी कार्यशाळा घेतल्या, त्यांचा अंत्य संस्कार बुध्द संस्कारनुसार घम्मगुरू सर्वच भंन्ते यांनी त्यांचे पार्थीव शरीर ताब्यात घेवून सलामीत दहन देण्यात आले अंत्यविधी संस्कारला संपुर्ण महाराष्ट्रातुन भंन्ते, तसेच बौध्द उपासक तथा उपासिका व महिला संघ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.