” भूमीराजा ” ने बातमीतुन मांड लेल्या व्यथेला मिळाला न्याय
हेमंत शिंदे -: नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
भूमीराजा ने आपल्या शनिवार च्या बातमी मध्ये एमपीएससी ने सरकारी वकिलांच्या परीक्षा इंग्रजीतच होणार असल्याचे जाहीर करुन महाराष्ट्रातील वकिलावर होणाऱ्या अन्यायाची बातमी दिली होती.
” भूमीराजा ” ने बातमीतुन मांडलेल्या अन्यायाला राज्यातील सरकारी वकिलांची नेमणूक करताना त्यांच्या परीक्षा मराठी भाषेतही घ्याव्यात असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठाने देवुन महाराष्ट्र राज्य सर्विस कमिशनला एक प्रकारे चपराक दिली आहे.
सरकारी वकील पदाची परीक्षा इंग्रजी भाषेसोबतच मराठी तही घ्यावी, अशी याचिका प्रताप जाधव यांनी केली होती. दंडाधिकारी आणि न्यायाधीशांच्या परीक्षामध्ये मराठी उत्तरे लिहिन्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल आणि सरकारी वकिलांच्या परिक्षेसाठी नाही, असे सरकार म्हणू शकत नाही. त्यामुळे यापुढील परीक्षा इंग्रजी भाषेसोबतच मराठीतही घ्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
प्रतिक्रिया -:हेमंत शिंदे -: नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अदयाप मिळालेला नाही. त्या बाबतीत केंद्र सरकार कडून मराठी भाषेबाबत सातत्याने दुजाभाव केला जात आहे. अशा बिकट परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेच्या संवर्धन व न्यायालयीन कामकाज मराठी भाषेतच झाले पाहिजे या धोरणा शी प्रामाणिक रहाणे गरजेचे असतांना असे चुकीचे दळभद्री निर्णय घेत आहे.
पण उच्च न्यायालयाने आपल्या आदेशाने शासनाला चपराक लगावली आहे. व भूमीराजा ने आपल्या बातमीपत्रा मांडलेल्या व्यथेला न्याय मिळाला आहे.