Home Breaking News गुरुवर्य एम.पी.भवरे स्मृती पुरस्कारांचे होणार कामारी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण!

गुरुवर्य एम.पी.भवरे स्मृती पुरस्कारांचे होणार कामारी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण!

👉🏻अभिनेता एस.व्ही रमणा यांच्या सह २० व्यक्तीचा होणार सन्मान..

हिमायतनगर /-कृष्णा राठोड
दि.११- सन २०२१/२०२२ वर्षीचा गुरुवर्य एम.पी. भवरे स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आल्याची माहिती बहुजन टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांनी दिली आहे हे पुरस्कार निवड समितीचे सिनेअभिनेता डाॅ. प्रमाेद अंबाळकर ,डाॅ.पी.बी.नामवाड ,यशवंत थाेरात यांनी पुरस्कार घाेषित केले.

राज्यस्तरीय पुरस्कार घोषित व्यक्ती पुढीलप्रमाणे आहेत अभिनेता दिग्दर्शक एस.व्ही. रमणा,(राज्यस्तरीय सेवा गौरव), हास्यसम्राट-झी टीव्ही स्टार सिद्धार्थ खिल्लारे (उत्कृष्ट कला गौरव) , पत्रकार तथा निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे (पत्र भूषण), स्वियसहाय्यक जि.प.बालाजी नागमवाड(सेवा गौरव), समाजसेविका श्रीमती विजया काचावार ((सेवा गौरव), विस्तार अधिकारी प.स.लोहा डि आय गायकवाड (सेवा गौरव), समाज कल्याण निरिक्षक श्रीमती एस.जी.वागतकर(सेवा गौरव), जिल्हा कार्यक्रम अधिकारी जि.प. मिलिंद व्यवहारे (सेवा गौरव)समतादूत दिलिप सोंडारे(सेवा गौरव) समाज सुधारक कैलास गायकवाड (सेवा गौरव), वनाधिकारी श्रीकांत जाधव (कर्तव्यदक्ष अधिकारी) वनाधिकारी अनिल रासने (कर्तव्यदक्ष अधिकारी),हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन साहेब (कर्तव्यदक्ष अधिकारी), वनाधिकारी एस.डी.हराळ(कर्तव्यदक्ष अधिकारी) कृषी अधिकारी पुंडलिक माने(कर्तव्यदक्ष अधिकारी), मुख्याध्यापक सरसम गजानन सुर्यवंशी (आदर्श मुख्याध्यापक), सहशिक्षक समाधान सुर्वे (आदर्श शिक्षक) वनपाल अण्णासाहेब वडजे (सेवा गौरव) सहशिक्षक गोपाल तुमल्लवार (आदर्श शिक्षक), वनपाल अमोल कदम(सेवा गौरव) यांना दि 18 सप्टेंबर रोजी हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु.येथील लोककलावंत शाहीर मेळाव्यात हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्रिरत्नकुमार भवरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी माहिती दिली आहे.

Previous articleतालुक्यातील मतदारांनी निवडणूक ओळखपत्राला आधार लिंक करून घेण्याचे तहसीलदार डी.एन. गायकवाड यांनी केले आव्हान….
Next articleसरकारी वकिलांच्या परीक्षा मराठीतही घ्या उच्च न्यायालयाचे आदेश