हिमायतनगर /-( कृष्णा राठोड )
शहरासह तालुक्यातील प्रत्येक मतदार नागरीकांनी निवडणूक ओळखपत्राला आधार जोडून घेणे अनिवार्य असुन आपल्या गावातील मतदान केंद्रांवर जाऊन बिएलओ यांना भेटून ओळखपत्राला आधार जोडून घेण्याचे आवाहन तहसीलदार डि.एन.गायकवाड यांनी केले आहे .
हिमायतनगर तहसील प्रशासनाकडून दि. 11 सप्टेंबर रविवारी सकाळी 11 वाजता परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयात मतदार याद्यांच्या प्रामाणीकरणासाठी, दुबार नावे वगळण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात ऐतांना मतदान कार्ड व आधार सोबत घेऊन येण्याचे आवाहनही तहसील कार्यालयाकडून करण्यात आले आहे.आपल्या गावातील बिएलओ ना संपर्क करावा असे निवडणूक नायब तहसीलदार एस. व्ही. ताडेवाड यांनी सांगितले आहे. शहरासह ग्रामीण भागातील बिएलओ कडून प्रत्येक नागरीकांच्या मतदान कार्डाला आधार लिंक करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक मतदार नागरीकांनी आपले आधार मतदान कार्डाशी जोडून घेणे गरजेचे आहे. तहसील प्रशासन निवडणूक विभागाच्या वतीने प्रत्येक बिएलओ मार्फत आधार जोडण्याचे काम गावातील मतदान केंद्रावर सुरू आहे. प्रत्येक बुथच्या बिएलओ यांना भेटून जास्तीत जास्त नागरीकांनी मतदान कार्डाला आधार जोडून घेण्याचे आवाहन तहसीलदार डि. एन.गायकवाड यांनी केले आहे.