Home Breaking News मादापुरच्या नाल्यावरील पुलांचे काम आजही अर्धवटचं!

मादापुरच्या नाल्यावरील पुलांचे काम आजही अर्धवटचं!

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 10-09-2022

हिमायतनगर तालुक्यातील मौजे मादापुर या गावांमध्ये 100% आदिवासी बांधव राहतात. त्या गावावरुन दगडवाडी, वाशी ते तेलगंणा या शेजारी राज्यात जाता येते. हा दुसरा पर्यायी मार्ग आहे. त्याअगोदर सवना ज. ते महादेव फाटा- रमणवाडी- चिंचोरडी- वाशी मार्गाने तेलंगणा राज्यात प्रवाशांना जाण्यासाठी हक्काचा मोठा तो पण दुरावस्थेत आजतागायत परीस्थितीत तसाच आहे.
पण मौजे सवना ज. नाल्यावरील पुलांचे कोट्यावधीचे काम थातुरमातुर केले आहे. अनेक वेळा भुमी न्युज चॅनल ने याचा पाठपुरावा करत, आजही पुलावरुन चारचाकी डगमगते. हे दुर्दैव म्हणावं लागेल का?
त्यांनंतर मौजे मादापुर या गावांमध्ये प्रवेश करतांनाच हा खुप मोठ्या नाल्यावर बांधकाम होत आहे. असे लक्षात येताच, पर्यायी मार्ग बनवुन देऊन हा का? बनवला असेल, असेल वाहनधारकांना सहजच लक्षात येते. ऐवढी दुरदशा या पुलाची गेल्या एक वर्षापासून या पुलाचे काम चालू आहे. सन्माननीय गुत्तेदार झोपीत आहेत का? असा मादापुर येथील पृथ्वीराज बुरकुले यांच्यासहित नवतरुणांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना उपस्थित केला.
मादापुर येथील नागरिकांनी याच गुत्तेदाराला आमच्या गांवचे काम अर्धवट अवस्थेत सोडून, आम्हाला त्रास देयायचा होता तर…टेंडर का? घेतले असा जळजळीत प्रश्न विचारला आहे. कधीही फोन करा फोन उचलत नाहीत. या गुत्तेदार महोदयांना आम्हाला जाण्यायेण्याचा काय? आहे. यांची जाणीव आहे का? असे एक नाही तर अनेक प्रश्न आमच्या प्रतिनिधींना विचारुन या आदिवासी बांधवांनी रोष व्यक्त केला. शेवटी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर साहेब यांनी तरी या कामाकडे लक्ष द्यावे. अशी मागणी पृथ्वीराज बुरकुले यांनी केली आहे.

Previous articleएमपीएससी ” ची बोलाचीच कढ़ी अन बोलाचाच भात
Next articleतालुक्यातील मतदारांनी निवडणूक ओळखपत्राला आधार लिंक करून घेण्याचे तहसीलदार डी.एन. गायकवाड यांनी केले आव्हान….