एमपीएससी ने स्वताच्या मराठी धोरणाला फासला हरताळ
सरकारी अभियोक्त्यांची परिक्षा इंग्रजीतच
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नं.8983319070
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काही महिन्या पुर्वीच आगामी परीक्षा मराठीत घेण्याचे धोरण निश्चित केले होते. पण येत्या रविवारी ( दि.11) होणाऱ्या सरकारी अभियोक्त्यांची परीक्षा केवळ इंग्रजी या एकाच माध्यमातून होणार आहे. त्यामुळे भावी सरकारी वकीलांचा काही प्रमाणात भ्रमनिरास झाला आहे.
मराठी विद्यार्थी, उमेदवार यांना स्पर्धा परिक्षेत अपेक्षित भाषा कौशल्याअभावी क्षमता, नॉलेज असतानाही यश मिळत नसल्याने आपल्या मातृभाषेतच म्हणजे मराठी मध्ये परीक्षा ठेवावी अशी मागणी काही गत काही वर्षा पासून होत होती. त्यात यूपीएसी व एमपीएसी या दोन महत्वाच्या परीक्षाचा समावेश होता.
त्यानुसार यापुर्वीच यूपीएससी ने मराठीचा पर्याय दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही मराठीचे धोरण स्वीकारले असून लवकरच अभ्यासक्रम मराठीत देणार व परीक्षा व मुलाखत सुद्धधा मराठीतच घेणार असे आयोगा चे सदस्य प्रताप दिघावकर यांनी नुकतेच सांगितले होते. पण, रविवार होणाऱ्या सरकारी वकिलांच्या परीक्षेसाठी इंग्रजी हेच माध्यम ठेवल्याने केव्हा मराठीचा पर्याय उपलब्ध होईल याकडे उमेदवारांचे डोळे लागले आहे.