विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर यांच्या हस्ते आरती संपन्न
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070
नाशिक येथील पावणे दोनशे वर्षोंची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनलयाच्या वतीने पुस्तकांच्या माध्यमातून गणेशमूर्ती सा करण्यात आली आहे.त्या मध्ये सांस्कृतीक, धार्मिक, आयुर्वेदीक पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे.
वाचन संस्कृतीला चालना मिळावी म्हणून उत्सहाच्या अखेरचे चार दिवस सकाळची आरती पुस्तक भिशी मंडळा कडून केली जाणार आहे. व संध्याकाळच्या आरतीला सनदी व पोलीस अधिकाऱ्याना निमंत्रित करण्यात आले आहे.
नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर साहेब यांना रविवारी संध्या काळच्या आरती करीता विशेष अतिथि म्हणून वाचनालयाच्या पदाधिकार्याच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते.
वाचनालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी प्रथम सार्वजनिक वाचनलयाच्या वस्तुसंग्रहालयाला सदिच्छ भेट दिली. पधाधिका-यानी यावेळी
वाचनालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती त्यांना दिली.
विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर साहेब यांनी वाचनालयाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करुन पुढील वाटचाली करीता नवीन निवडून आलेल्या कार्यकारी मंडळाला शुभेच्छा दिल्या.
त्या नंतर त्याच्या शुभहस्ते गणेशाची आरती करण्यात आली. या वेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष वैध विक्रांत जाधव यांच्या हस्ते त्यांचा शाल, बुके व भेटवस्तु देवून सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी वाचनालयाचे ग्रंथ सचिव जयप्रकाश जातेगावकर,अर्थ सचिव देवदत्त जोशी,सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर, सदस्य सोमनाथ मुठाळ, वाचनालयाचे सभासद तथा भूमीराजा साप्तहिकाचे नाशिक जिल्हा संपादक हेमंत शिंदे, वाचनालयाचे कर्मचारी बोरस्ते सर, रत्नपारखी सर यांच्या सह सभासद व कर्मचारी मोठ्या संख्ये मध्ये उपस्थित होते.