Home Breaking News ई-पीक पाहणीसाठी एक दिवसीय विशेष मोहीम.

ई-पीक पाहणीसाठी एक दिवसीय विशेष मोहीम.

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी

खामगाव:-तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की १३सप्टेंबर रोजी खामगाव -तालुक्यातील सर्व गावांमध्ये एक दिवस ई-पीक पाहणीसाठी ही एक दिवसीय मोहीम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी आपल्या शेतातील पीक पेरा आपण स्वतः ई-पीक पाहणी या मोबाईल ॶॅपद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.मागील खरीप व रब्बी हंगामामध्ये खामगाव -तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पीक पाहणी स्वतः नोंदविलेली आहे.
यावर्षी खरीप हंगामामध्ये आपल्या शेतामध्ये जे पीक पेरले आहे त्याची पीक पाहणी ही ई – पीक पाहणी मोबाईल ॶॅपद्वारे नोंदवावी व आपल्या सातबारा वरील पेरा अद्ययावत करावा.आपल्या सातबारा वरील पीक पेरा अद्ययावत असणे हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.यासाठी बुधवार १३ सप्टेंबर रोजी एक दिवसीय विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे.या दिवशी प्रत्येक गावामध्ये कोतवाल, तलाठी हे उपस्थित राहून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी मार्गदर्शन करतील.मंडळ अधिकारी नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तालुक्यातील गावांना भेटी देणार आहेत.गावातील सर्व माननीय सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, तंटामुक्ती अध्यक्ष, आशा स्वयंसेवीका, अंगणवाडी सेविका,या सर्वांनी एक दिवसीय ई-पीक पाहणी मोहीमेमध्ये सहभाग घेऊन गावातील खरीप पीक पेर्याची १००% ई-पीक पाहणी ची ॶॅपमध्ये नोंद होईल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन खामगाव तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे.

Previous articleपोलीस स्टेशन पोलीस हिमायतनगर येथे कार्यरत असणारे सुधाकर लक्ष्मण कदम यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती…..!
Next article@ दुःखद निधन @