Home Breaking News बजरंग गणेश मंडळा तर्फे आयोजन केलेल्या रक्तदान शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….

बजरंग गणेश मंडळा तर्फे आयोजन केलेल्या रक्तदान शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….

👉🏻शिवसेना जिल्हा प्रमुख नागेश पाटील आष्टीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांची प्रमुख उपस्थिती

हिमायतनगर /- कृष्णा राठोड शहरातील श्री बजरंग गणेश मंडळाची मागील 14 वर्षापासूनची रक्तदान शिबिराची परंपरा या वर्षी पण अविरत चालू ठेवून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर व पोलीस उपविभागीय अधिकारी भोकर अर्चना पाटील व शेवाळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हिमायतनगर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनुर यांनी प्रथम रक्तदान करून सुरवात केली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी असे सांगितले की हिमायतनगर शहरात हिंदू मुस्लिम एकता कायम डोळ्यासमोर ठेवून बजरंग गणेश मंडळा कडून मागील 15 वर्षा पासून रक्तदान शिबिर घेतले जाते हीच परंपरा कायम ठेवत ह्या वर्षी दि 6 सप्टेंबर रोजी शहरातील अनेक हिंदू व मुस्लिम बांधवांनी सुद्धा ह्या रक्तदान शिबिरात सहभाग घेतल्याचे पहायला मिळाले त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त नव तरुणांनी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याने या शिबिरात सहभाग घेऊन आपले रक्तदान करावे असे आव्हान केले व आगामी काळातील गणेश विसर्जन मिरवणुका अत्यंत शांततेत व कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून साजरे करावेत असे आवाहन उपस्थित गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी केले
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील मॅडम, शेवाळे साहेब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्यामजी रायेवार, परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ , हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बि.डी. भुसनूर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, विशाल राठोड,शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक सेठ, विलास वानखेडे ,प्रकाश रामदिनवार,राम नरवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान, माजी नगरसेवक प्र. सावन डाके, अनवर खान पठाण, सदाशिव सातव, सरदार खान, सह शहरातील डॉक्टर ज्येष्ठ नागरिक व अनेक गणेश मंडळाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते.

Previous articleवारसा शिल्पकलेचा…. परिस प्रकाशन लेखक – संदीप राक्षे…
Next articleपोलीस स्टेशन पोलीस हिमायतनगर येथे कार्यरत असणारे सुधाकर लक्ष्मण कदम यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती…..!