Home Breaking News नवनिर्वाचित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचा कार्येकर्त्या कडुन सत्कार.

नवनिर्वाचित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचा कार्येकर्त्या कडुन सत्कार.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक -06 सप्टेंबर 2022

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, यांनी हदगांव हिमायतनगर चे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची नांदेड जिल्हाप्रमुखपदी नव्यानेच निवड केली आहे. त्याअनुषंगाने हिमायतनगर नांदेड जिल्ह्यातील व हदगांव- तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला आहे.
माजी आमदार, नांदेड जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक नागेश पाटील आष्टीकर यांची नांदेड जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात विविध विकास कामे त्यांनी केली आहेत. सतत शिवसेनीकांच्या व जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच कटिबद्ध असतात.
कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब केशवराव चौरे, माजी सभापती गजानन तुपतेवार, संतोष अप्पा पळशीकर, तालुका संघटक संजय काईतवाड आदी तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख ,माजी आमदार, नांदेड जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक नागेश पाटील आष्टीकर यांचा सत्कार केला आहे.

Previous articleहे गणराया….शेतकऱ्यांवरील संकटे दुर कर!
Next articleप्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांचा