👉 लोकप्रिय आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी लालबागच्या राजांना घातले साकडे…
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 06 सप्टेंबर 2022
सध्या राज्यात सर्वत्र विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव साजरा होत असतांनाच, हदगांव – हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी मुंबई येथील प्रसिद्ध असलेल्या, लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन. राज्यातील व विशेषत: हदगांव- हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांवरील आलेले संकट दूर करण्यासाठी मनोभावे दर्शन करून, गणपती बाप्पाला साकडे घातले आहे.
आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
शेतकरी, कष्टकरी, मजुरदार आणि सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून जाणारे एकमेव लोकनेते म्हणून त्यांची ख्याती आहे. सर्वसामान्य कार्यकर्ताचा फोन उचलुन अभ्यास पुर्ण पध्दतीने उतर देतात. ह्याच त्यांच्या कामाच्या पध्दतीने ते अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. हे सत्य कुणालाही नाकारता येत नाही. प्रत्येक गावातील अडीअडचणीच्या गावातील नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर दिसतात.
👉 सवना ज. येथील बौध्द विहारापासुन ते ग्रामपंचायतीच्या रस्त्यांची दुरवस्था झाली होती. गणेश विसर्जनापुर्वी हा रस्त्याची दुरुस्ती होईल. असे आश्वासन आमदार महोदयांच्या वतीने कृ.उ.बा.समितीचे मा.संचालक शेख रफीक शेठ यांनी दिले आहे.