Home Breaking News प्रधानमंत्री ‌‌सुश्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत तालुका स्तरीय शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न.

प्रधानमंत्री ‌‌सुश्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत तालुका स्तरीय शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 06 सप्टेंबर 2022

हिमायतनगर तालुका कृषी कार्यालय येथे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कच्च्या मालापासुन प्रकीया करुन पक्का माल कसा बनविता येईल. याविषयी प्रधानमंत्री सुश्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत शेतक-यांना विविध तज्ञानी मार्गदर्शन केले आहे.
मंडळ कृषी अधिकारी किनवट यांनी आपल्या मनोगतात सांगतांना ते म्हणाले केळीपासून चिप्स, बटाट्यापासुन चिप्स व दुधापासून खवा, पनीर असे विविध प्रकार बनविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. डाळमिल पाॅलीस व पॅकींग, हळदीपासुन हळद पावडर बनविणे, मिरची पावडर, , मसाला उद्योग, गुळ पावडर, गुळ उद्योग इत्यादी अनेक शेतीशी निगडित उद्योग शेतकऱ्यांना करता येतात. याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा ही मिळतो.
यावेळी तालुका कृषी अधिकारी चना साहेब मंडळ कृषी अधिकारी कारळे साहेब आणि प्रदिप पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, कृषि मित्र आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन पिक विमा प्रतिनिधी सचिव घुले यांनी केले. तर आभार प्रदर्शन तांलुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शिवदर्शन घुमलवाड यांनी केले.

Previous articleफुले-आंबेडकरी शैक्षणिक विचार आचरणात यावे,स्वतःच्या धडावर स्वतःचा मेंदू असल्याशिवाय देशोन्नती अशक्य : शरद शेजवळ
Next articleहे गणराया….शेतकऱ्यांवरील संकटे दुर कर!