Home Breaking News फुले-आंबेडकरी शैक्षणिक विचार आचरणात यावे,स्वतःच्या धडावर स्वतःचा मेंदू असल्याशिवाय देशोन्नती अशक्य :...

फुले-आंबेडकरी शैक्षणिक विचार आचरणात यावे,स्वतःच्या धडावर स्वतःचा मेंदू असल्याशिवाय देशोन्नती अशक्य : शरद शेजवळ

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नं – 8983319070

येवला
महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार कार्य अंगीकारले शिवाय गत्यंतर नसून फुले-आंबेडकरी शैक्षणिक विचार आचरणात यावेत व स्वतःच्या धडावर स्वतःचा मेंदू असल्याशिवाय देशोन्नती अशक्य आहे असे प्रतिपादन लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान व अध्यापकभारती चे संस्थापक शरद शेजवळ यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी शाळा बाभूळगाव तालुका येवला येथे जाहीर व्याख्यान ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या मा.आयुक्त समाज कल्याण पुणे, मा. प्रादेशिक उपायुक्त नाशिक विभाग नाशिक व मा सहा आयुक्त समाज कल्याण नाशिक यांच्या सुचनेनुसार विद्यार्थी ज्ञानवर्धन व माहितीसाठी देशातील सामाजिक सुधारणा तथा शैक्षणिक विचार कार्यात अतुलनीय योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांना शैक्षणिक अध्ययन अभ्यासात रुची निर्माण व्हावी याकरता आदर्शवत महापुरुष व महिलांच्या शैक्षणिक कार्य व योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना शेजवळ यांनी यावेळी करून दिली.

विद्धे विना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे कुटुंबा कोसावे आनंदाने सर्व मुली मुला शाळेत घालावे सर्वांस द्यावे विद्यादान ह्या महात्मा फुले यांच्या अनखंडाचा संदर्भ देऊन शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जो ते प्राशनराशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, जा तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे,विद्या विनय आणि शील याशिवाय शिक्षण व्यर्थ आहे हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आठवण ह्या वेळी शेजवळ यांनी विद्यार्थ्यांना करून देऊन फुले आंबेडकर व तमाम मानवतावादी युगपुरुष-महिला यांना डोक्यात घेऊ जीवन जगावे असे मत शेजवळ यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
पी.एन.पाटील होते.सुत्रसंचालन-
ए.ए.येळकर मॅडम यांनी केले.एम.के.विंचू सर,एम.ए.पानपाटील सर मनोगत व्यक्त केले. आभार एस.सागरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले

Previous articleआमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नाने बोरगडी तांडा२ येथे मिळाला तात्काळ गावठाण डीपी..
Next articleप्रधानमंत्री ‌‌सुश्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत तालुका स्तरीय शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न.