Home Breaking News हर्ष उल्हासामध्ये जेष्ठ गौराईचे आगमन.

हर्ष उल्हासामध्ये जेष्ठ गौराईचे आगमन.

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक -. 04 सप्टेंबर 2022

बळीराजानी आपल्या लाडक्या सर्जाराजा पोळा साजरा केला. नंतर गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन झाले. आणि आता जेष्ठ गौराईचे आगमन. एकुणच सर्वत्र “आनंदी आनंद गडे”
महालक्ष्मी पुजन या सणानिमित्त सासरहुन माहेरला जाणारी सुवासिण माता भगिनी, अधिकारी, कर्मचारी, दुरगांवी शिक्षण घेत असलेले शालेय विद्यार्थी, हेही आपल्या मुळगांवी जाऊन महालक्ष्मी सणानिमित्त सर्वांना भेटण्याचा आनंद काहीसा वेगळा आहे. महालक्ष्मी पुजनाची तयारी काही दिवसांपूर्वीच करावी लागते. म्हणुनच बाजारात सामानाची खरेदी करतांना गर्दीच गर्दी दिसुन आली. घरोघरी हा सण मोठ्याप्रमाणावर साजरा होत आहे. असाच प्रत्येकांच्या चेह-यावरवरील आनंद काहीसा दिसुन आला. आपल्या गौराईची आकर्षक सौंदर्यासाठी सजावट करुन, मनोभावे पूजा प्रार्थना करत जिवनात सुखसमाधान, समृद्धी मिळो…या निमित्ताने सर्वांना साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनल परीवाराच्या वतीने शुभेच्छा..

Previous articleजनावरांना लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव….
Next articleसिन्नर तालुक्यातील पुरग्रस्तांना सांगली, कोल्हापुरच्या धर्तीवर मदत