👉🏽गोठ्यात स्वच्छता ठेवून, लंम्पी रोगापासून जनावरांना दूर ठेवावे- यु.बी.सोनटक्के
हिमायतनगर/- कृष्णा राठोड
तालुक्यात जनावरांना लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून पशुसंवर्धन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून शेतकऱ्यांनी गोमाशे व गोठा साफ मोहिम शेतकऱ्यांनी सुरु करुन रोगापासून जनावरांना दूर ठेवावे आणि आपल्या गोठ्यात स्वच्छता ठेवावी असे आव्हान पशुवैद्यकीय अधिकारी यु.बी. सोनटक्के यांनी शेतकर्यांना केले आहे.2 सप्टेंबरला खडकी,कामारी, टेंभी आदी गावात जावून गोटा फवारणीचा डेमो दिला असल्याचे सांगीतले.
लंम्पी स्कीन रोग असून गोट पाॅक्स विषाणू मूळे होतो. त्याची लक्षणे गाय, म्हैस या जनावरांना ताप येणे, शरीरावर गाठी येणे, गाभण जनावरांचा गर्भपात होणे, लंम्पी रोगाची आदी लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसून येताच पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात तात्काळ माहिती द्यावी. यासाठी करंजी तेल 5ml नीमतेल 5 ml प्रत्येकी एक लिटर पाण्यात मिसळून अंगाचा साधनाचा फेस केलेली पाणी हे समप्रमाण द्रवणात तयार करून गोठ्यात फवारावे असे डॉक्टर यु.बी. सोनटक्के यांनी सांगितले
गोट पाॅक्स विषाणू लम्पीरोग प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरु केली जाणार आहे. नांदेडहून गोट पाॅक्स लसीचे वाटप होताच लसीकरण मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती पशू वैद्यकीय अधिकारी यु.बी. सोनटक्के यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले आहे.