मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 04 सप्टेंबर 2022
गेल्या दहा ते बारापासुन उघडदिप दिलेल्या पावासामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती. 03 तारखेच्या मध्यरात्री पासुन पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. एकंदरीत सर्वत्र गणपती आणि जेष्ठ गौरीचे पुजनाची धामधुम चालू असतांच, रात्रीपासून वरुणराजाचे आगमन झाले आहे.
कडक उन्हाच्या तीव्रतेमुळे पिके कोमेजून जात होती. शेतकरी बांधवांचा जिव टांगणीला लागला होता. आधी अतिवृष्टीने, आता पाऊस पडत नसल्याने यावर्षीचा खरीप हंगाम नुकसानदायक ठरत आहे. असेच चित्र सर्वत्र दिसत होते. परंतु म्हणतात ” आले देवाजीच्या मना तिथे कोणाचेच चालेला” या पावसामुळे सोयाबीन पिकांच्या शेंगा भरण्यास खूप मोठी मदत होणार. कापुस, हळद याही पिकांना चांगला फायदा होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येईल. असे जाणकार शेतकरी सांगत आहेत.