Home Breaking News लोहारा येथील सर्पमित्र यांनी ६ फुट नागाला जीवदान

लोहारा येथील सर्पमित्र यांनी ६ फुट नागाला जीवदान

भूमीराजा न्यूज
प्रतिनिधी/ संतोष मोरे

लोहारा:- बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्पमित्र तेज बघे,पवन वाघ, विशाल घावट यांनी ६ फुट नागाला दिले जीवदान. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाला कि अनेकदा सापांचे दर्शन होते. नागरिक घाबर जातात.अशावेळी लोहारा  परिसरातील सर्पमित्र लोकांच्या जीविताला हानी पोहचु नये म्हणून साप निघाल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी धाव घेत. स्वतः;चा जीव धोक्यात घालत या सापांना पकडून जीवनदान देण्याचे कार्य करतात.  अनेक सर्पमित्र  सापाच्या रक्षनाकरिता पुढे येत त्यांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा सोडण्याचे काम करतात.अशाच एक प्रकार लोहारा येथुन जवळच असलेल्या डोंगरगाव येथील इंगळे यांच्या घरात घडला. त्यांच्या राहत्या घरात ६ फुट साप दिसला. त्यांनी लगेच सर्पमित्र तेज बघे यांना फोन करून साप पकडण्यासाठी बोलावले. नागाला पकडत घरा बाहेर काढले   तापासणी करीत दोन नाग  पकडत त्यांना बाहेर काढले. व या तिन्ही सर्पमित्रानी त्या सापाला मुक्त संचारासाठी  जंगलात सोडले.

Previous articleनिंबा फाटा येथे वंचित बहुजन आघाडी च्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
Next articleगणेशोत्सवात विद्युत पुरवठा नियमित खंडित होत असल्याने भारतीय जनता पार्टी हिमायतनगर तर्फे महावितरण च्या उपविभागीय अभियंताना देण्यात आले निवेदन!