” भूमीराजा ” ने केलेल्या पाठपूराव्याला मिळाले यश
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नं.-8983319070
पत्रकारितेचे मुक्तचे खुप वर्षा पासून एच. पी. टी. कॉलेज मध्ये असलेले अभ्यासकेंद्र विद्यापीठाने अचानक बंद केले होते, त्यांमुळे विद्यार्थीची होत असलेली ससेहोलपटची बातमी 24 ऑगस्ट ला दिली होती व त्यांसंदर्भ मध्ये त्वरीत नवीन केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती.
त्या “भूमीराजा ” ने दिलेल्या बातमीची दखल घेऊन पाथड़ी’ फाटा येथील जी. डी. सावंत महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या केंद्रास परवानगी मिळाली आहे. येंदापासून केंद्र सुरु झाले असल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख यांनी दिली. यामुळे आता नाशिक शहरातील पत्रकारितेच्या तब्बल 350 पेक्षा जास्त विध्यार्थी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमात न बसणारे अभ्यासकेंद्र बंद करावे लागले होते. त्यातच के. टी. एच. एम. व व्ही. एन. नाईक या सारख्या बड्या महाविद्यालयांनी मुक्तचे केंद्र सुरु करण्यास जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत नकार दिला. नवीन केंद्रामुळे द्वितीय आणि तृतीय वर्षात विद्यार्थी प्रवेशित झाले आहे. विद्यापीठाने त्यांचे प्रवेशही ऑनलाइन प्रक्रियेनुसार करून घेतले. पण प्रवेश अर्ज अभ्यास केंद्रावर जमा करावयाचा असल्याने हा अर्ज जमा करावयाचा असल्याने हा अर्ज जमा करण्यासाठी शहरात केंद्रच नसल्याची अडचन झाली होती.
प्रतिक्रिया -:हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
पत्रकारीतेच्या विद्यार्थीवर होणाऱ्या अन्यायाच्या बातमीची दखल घेऊन नवीन अभ्यासकेंद्र सुरु केल्याच्या निर्णयाच स्वागतच आहे. परंतु मध्यवर्ती केंद्र बंद करुन शहराबाहेर केंद्र दिल्याने विद्यार्थीना नाहाक आर्थिक भुर्दड सहन करावा लागतो. याआधी पण मुक्त विद्यापीठाने त्यांच्या असलेल्या बी. लीब. व एम. लीब. च्या अभ्यासक्रमाचे मध्यवर्ती असलेले सार्वजनिक
वाचनालयाचे केंद्र बंद केल्यामुळे जिल्ह्याभरातून येणाऱ्या विद्यार्थीची गैरसोय झाली आहे. तरी यापुढे केंद्र देताना यांचा विचार व्हावा.
” भूमीराजा ” याच आक्रमक वृत्तीने समाजातील कुठल्याही घट कावर अन्याय होत असल्यास ” समाजाच्या न्याय हक्कांसाठी ” या ब्रीदाने त्याना न्याय देण्यासाठी ठामपणे उभा राहील याची ग्वाही देतो.