Home Breaking News शेगाव येथे पोषण माह समारोह कार्यक्रम संपन्न

शेगाव येथे पोषण माह समारोह कार्यक्रम संपन्न

 अँकर शितल शेगोकार.  शेगाव प्रतिनिधी भूमीराजा न्युज

आज दिनांक 01/09/2022 ते 30/09/2022पोषण अभियान कार्यक्रमाचा पहिला दिवस पोषण माह समारोह कार्यक्रम शेगाव जिल्हा बुलढाणा अंगणवाडी केंद्र क्रमांक 123 भीमनगर शेगाव येथे घेण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित बालरोग तज्ञ डॉ अखिलेश कलावटे सर,प्राचार्य, शेळके सर, विभातील प्रतिष्ठीत नागरिक गणेश शेगोकार, प्रतिष्ठीत महिला सौ. मंदाताई घाटोळ आणी वार्डातील सर्व पालक वर्ग उपस्थित होते,पालक वर्गाला बालरोग तज्ञ डॉ अखिलेश कलावते सरांनी खूप मोलाचे आणि महत्वाचे असे मार्गदर्शन पालकांना केले तर शाळेच्या प्राचार्य शेळके सर यांनी आपल्या मुलांना शाळेत जाण्यास कसे प्रेरित, प्रोत्साहित,केले पाहिजेत यावर सांगितले, तर उपस्थित प्रतिष्ठीत नागरिक गणेश शेगोकर यांनी आपल्या मुलांना चांगल्या सवयी आणि जेवणाच्या लसीकरणाच्या आरोग्याच्या बाबतीत मार्गदर्शन केले, तसेच मंदाताई घातोल यांनी आपल्या मुलांना रोज आहार कसा व किती भरवावा आणि त्यांची वजन उंची त्यांच्या वयानुसार किती असायला पाहिजेत हे आपल्याला आपण आपले मूल जेव्हा अंगणवाडीत आणु तेव्हाच आपल्याला कळेल….,.
असे बरेचसे मार्गदर्शन केले..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका शितल शेगोकार यांनी केले तर आभार प्रदर्शन रेखा शेगोकार यांनी केले.

Previous articleअखेर….आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या पुढाकाराने पार्डी रस्ताची सुधारणा झाली..
Next article‘ ज़ी. डी. सावंत ‘ महाविद्यालया मध्ये मुक्त विद्यापीठाचे पत्रकारिता अभ्यासकेंद्र