मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 01 सप्टेंबर 2022
हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर शहरापासून ते पार्डी, (आईवाळा चौक ते डाव्या बाजूस सवना ज.), पुढे एकघरी, वाशी मार्गे तेलंगणात जाणारा याऐवजी रेल्वे गेटपासुन उजव्या हाताला वळल्यावर, फुलेनगर, टेंभी, आंदेगांव, पवना, दरेसरसम आदी गावांना हा रस्ता जातो. याच नागरीकांच्या, शेतकऱ्यांच्या आणी सर्वसामान्य जनतेच्या अडचणी लक्षात घेता. आपले लोकप्रिय, विकासप्रिय आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर साहेब यांनी त्वरित हिमायतनगर शहरापासून ते वरील सर्व गावांचा रस्त्यांचा प्रश्न सोडविला आहे. एवढेच नाही तर, स्वतः आमदार महोदयांनी प्रत्यक्ष दर्शनी उभे राहून, कामाची पाहणी केली. आणि किमान दहा गावच्या नागरीकांचा प्रश्न सोडविला आहे. तसेच तेलंगणात जाणा-या प्रवाशांची गैरसोय दुरसोय केली आहे.
यावेळी उपस्थित प्रसंगी आ. माधवराव पाटील जवळगावकर सोबत मा. जि.प. सदस्य आमचे मामा सुभाषदादा राठोड, तालुका काॅग्रेस कमिटीचे मा. अध्यक्ष जनार्धनरावजी ताडेवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डाॅ. प्रकाश वानखेडे, मा. कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक रफीक सेठ, मा. नगराध्यक्ष अ. अखील शेठ, हिमायतनगर शहराध्यक्ष, आमचे प्रिय मित्र, शहराध्यक्ष संजय माने, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी संरपंच समदखाॅन पठाण, बाकीसेठ,माजी सभापती तत्कालीन हदगांव पं. सं.चे दगडूजी काईतवाड, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पार्डीकर, जिरोणा ग्रामपंचायत कार्यालयचे मा. सरपंच तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बळवंत जाधव, युवकांचे प्रेरणास्थान योगेश चिल्कावार माजी नगरसेवक तथा माजी सरपंच संतोष शिंदे, माजी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाषमामा शिंदे, सवना ज. नगरीचे संरपंच परमेश्वर गोपतवाड, पत्रकार मारोती अक्कलवाड पा. सवनेकर, आमचे मित्र फिरोज खाॅन, असलम भाई, दिपक काञे, एकघरीचे विद्यमान संरपंच सरपंच सुनिल शिरडे, केरबा सुद्धेवाड, आदी तालुक्यातील काॅग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थीत होते.