Home Breaking News वाजत गाजत गणरायाचे सार्वजनिक आणि घरोघरी आगमन.

वाजत गाजत गणरायाचे सार्वजनिक आणि घरोघरी आगमन.

👉”गणपती बाप्पा मोरया….” सर्वत्र हाच जयघोष..

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 31 आॅगष्ट 2022

संबंध जिल्ह्याभरात आज गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार करीत. ढोलताशांच्या गजरात अनेक मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.
दिड दिवसांचा गणपती बाप्पाचे अनेकांनी घरोघरी हर्ष उल्हासात श्रीचे आगमण धुमधडाक्यात केले आहे. सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्षांनी व सदस्यांनी मोठमोठ्या गणपती बाप्पाच्या मुर्ती अतिशय मनमोहक दिसणारी मुर्त्या खरेदी केल्या आहेत. अकरा दिवस सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. हिमायतनगर तालुक्यात पोलिस स्टेशन मध्ये शांतता कमिटी, गणेश मंडळ, संरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, जेष्ठ नागरिक, पत्रकार, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पोलीसांना सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन केले आहे. प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण युक्त” आणि “गुलालापासून गुलाबाकडे” या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे साहेबांनी हिमायतनगर भेटी दरम्यान केले आहे.

Previous articleशहरात अगामी गणेश उत्सवाच्या निमीत्ताने शांतता समितीची बैठक संपन्न.
Next articleलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.