Home Breaking News शहरात अगामी गणेश उत्सवाच्या निमीत्ताने शांतता समितीची बैठक संपन्न.

शहरात अगामी गणेश उत्सवाच्या निमीत्ताने शांतता समितीची बैठक संपन्न.

कृष्णा घाटोळ
भुमिराजा शहर प्रतिनिधि बाळापुर

दि.30/8/2022

बाळापूर शहरात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत सर्वांना सोबत घेऊन विविध धार्मिक व गणेश उत्सव आनंदाने साजरे करा, असे आवाहन अकोला अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांनी केले.
बाळापूर पोलिस स्टेशनमध्ये आयोजित शांतता समिती सभेत बोलत होत्या.
विविध धार्मिक उत्सवासंदर्भात शासनाने नियमावली बनविली असून, त्या चौकटीत राहून सर्व घटकांना सोबत घेऊन आनंदाने व उत्साहाने सण साजरे करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पोलिस निरीक्षक दत्तात्रय आव्हाळ यांनी प्रास्ताविक विविध उत्सवांसंदर्भात विस्तृत माहिती दिली, तर शांतता समितीचे सदस्य गुलाम हुसेन आझाद, उमेशआप्पा भुसारी,भूषण गुजराथी,गुलाबराव उमाळे व पत्रकार उत्तमराव दाभाडे यांनी समस्या मांडल्या.
आभार प्रदर्शन पोलिस उपनिरीक्षक विनोद घुईकर यांनी केले तर सभेला शांतता समितीचे सदस्य व गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleमहावितरणच्या मदतीविणा शेतकऱ्यांनी स्व-खर्चाने पोल उभा केला.
Next articleवाजत गाजत गणरायाचे सार्वजनिक आणि घरोघरी आगमन.