Home Breaking News महावितरणच्या मदतीविणा शेतकऱ्यांनी स्व-खर्चाने पोल उभा केला.

महावितरणच्या मदतीविणा शेतकऱ्यांनी स्व-खर्चाने पोल उभा केला.

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 31 आॅगष्ट 2022

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने, पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी विद्युत मोटार चालू करुन, पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न केला होता खरा…पण नियतीच्या मनात वेगळेच…..शेतकऱ्यांना शेती करतांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पारडी फीटरवरुन पैलवाड डिपीवरील विद्युत तारेचा पोल वाकलेला होता. महावितरण विद्युत कंपनीच्या वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि लाईनमेन साहेबांना हि बाब गेल्या दोन महिन्यांपासून सतत लक्षात देऊन सुद्धा,

अखेर स्वतः शेतकऱ्यांनी स्व-खर्चाने आडवा पडलेला पोल उभा केला आहे. एकीकडे राज्य आणि केंद्र सरकार म्हणते या कृषिप्रधान देशातील शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार…अशी घोषणा करतात. यावर्षी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले, थोडीफार वाचलेल्या पिकांना, तुडुंब भरलेल्या विहिरीचे पाणी देण्यासाठी, लाईटची नितांत गरज असतांनाचं महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी लक्ष दिले नाही. एकीकडे प्रचंड पावसामुळे आणि आता महावितरणने शेतकऱ्यांची का? थट्टा माडली असावी. शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणी नाही म्हणून का? हा महावितरणचा बेजबाबदारपणा आहे का? एखाद्या लोकनेता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे का? प्रत्येकाला शेतकऱ्यांचांच सुड घ्यावा वाटतो का? अश्या एक नाही तर अनेक प्रश्न बळीराजा पुढे आ वासुन उभे आहेत.
साधुसंतांने सांगितले आहे. ” जगा आणि जगू द्या” आपणाला शासनाचा गलेलठ्ठ पगार मिळतो. तो कशाचा आहे. वेळेवर शेतकऱ्यांच्या शेतीला विजेचा पुरवठा करण्यासाठी, काही शेतक-यांचे लाईटचे प्रश्नांची सोडविण्यासाठीच या विचाराचे आत्मपरीक्षण महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी करावे. आणि शेतकऱ्यांना सहकार्य, सेवा आणि मदत करुन, या जगाच्या पोशिंदयाला जगण्याचे बळ महावितरण कंपनीने द्यावे. हिचं मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
👉 विशेषतः या पैलवाड डिपीवरील सर्व शेतकरी बांधवांनी बिले भरुन पावत्या घेतलेल्या आहेत. पण अन्याय आणि अर्थीक भुर्दंड का? सहन आम्ही शेतकऱ्यांनी करायचा हाच प्रश्न उपस्थित होतो आहे.

Previous articleदोन वर्षांच्या कार्यकाळातील केलेली सेवा सदैव स्मरणात राहील..
Next articleशहरात अगामी गणेश उत्सवाच्या निमीत्ताने शांतता समितीची बैठक संपन्न.