Home Breaking News मनावरील ताण कमी करण्यासाठी…

मनावरील ताण कमी करण्यासाठी…

👉” आरोग्यंम धन संपदा”

सौजन्य – सा. भुमी राजा न्युज चॅनल नांदेड……..
जिल्हा संपादक नांदेड.
दिनांक- 30 आॅगष्ट 2022

अनेकदा आपल्याला नैराश्य येतं. हे सगळे सोडून द्यावे, असे वाटू लागते. कशातच रस राहात नाही, त्याने अनेक शारीरिक आजारांना आपणच आमंत्रण देतो आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. मानसिक आरोग्य राखण्यासाठी आपण दररोज काही चांगल्या गोष्टी करू शकतो. पुढील गोष्टींचा •अवलंब केल्यामुळे आपले मानसिक आरोग्य नक्कीच उत्तम राहील.

मानसिक आरोग्य राखण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला लागेल. तुमचं जीवनाचं एक ध्येय असायला पाहिजे. लोकांचं भरपूर ऐकायची तयारी ठेवली पाहिजे. कमी बोललं पाहिजे. चिंतन मनन करण्याची सवय लावली पाहिजे. कोणाहीविषयी मनात अढी, नसावा. बोलताना विचार करावा, बोलल्यानंतर नाही. मान अपमान या भानगडीत पडू नये, हट्टीपणा नसावा, नवनवीन विषयांसदर्भात वाचत राहावे. जगातले सगळे ऐकावे, पाहावे; परंतु प्रतिक्रिया

नाती सांभाळावी. सगळ्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावावी. पुढील गोष्टी मनात पक्क्या ठेवा. त्यातून मनावरील ताण हलका होण्यास मदत होईल.

वास्तव परिस्थिती ओळखा, त्यात योग्य तो बदल करा.
> प्रतिकूल परिस्थितीला न डगमगता सामोरे जा.

> भूतकाळातील घटनांची जाणीव ठेवा, पण त्यात फार रमू नका.

> वर्तमानकालाचे भान व भविष्याचा वेध घ्या.
> इतरांच्या दोषांचे भांडवल करू नका. दुराग्रह

> इतरांशी तुलना करून स्वतःचे मूल्यांकन करू नये.
> अति महत्त्वाकांक्षांना वेळीच मुरड घाला.

> नियमित व्यायाम करा.
> स्वतःला व्यसनांपासून दूर
ठेवा..

मात्र कमी द्यावी. दोस्त जोडावेत. हसतमुख व आनंदी राहा.

👉 साप्ताहिक भुमी राजा न्युज चॅनल नांदेड.
जिल्हा संपादक नांदेड.
मो.नंबर-9763126813

Previous articleराशन दुकानदारांचे तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी
Next articleमविप्र ‘ मध्ये 20 वर्षानंतर ‘ परिवर्तन ‘ – – – – मात्र अध्यक्ष पदाचा अपवाद