Home राजकारण कळमनुरी मतदार संघात कोंग्रेस पक्षाला “जोर का झटका धिरेसे”…..

कळमनुरी मतदार संघात कोंग्रेस पक्षाला “जोर का झटका धिरेसे”…..

अंगद सुरोशे भुमीराजा ता. हिमातनगर/प्रतिनीधी

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदार संघात राजकीय उलथापालथ माजी. आमदार संतोष टारपे व अपक्ष जि.प.सदस्य डाॅ. अजित मगर यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश कळमनुरी येथील स्व.मा.खासदार राजीव सातव यांचे अत्यंत विश्वासू असणारे मा.आमदार संतोष टारपे यांनी शिवसेनेत प्रवेश करुन कोंग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला असल्याने कळमनुरीत राजकारणाचे समीकरण बदलणार आसे चित्र आहे कारण काही दिवसा पुर्वी कळमनुरी चे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंन्दे यांच्या गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला घरघर लागल्याचे बोलल्या जात असतांनाच अपक्ष अजित मगर व आ. टारपे यांच्या शिवसेना प्रवेशाने मात्र शिवसेनिकात नवचैतन्य निर्माण होणार का हा मोठा विषय आहे या प्रवेशा साठी हिंगोलीचे माजी.खा. सुभाष वानखेडे साहेब तसेच हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे मा. आमदार नागेश पाटिल आष्टीकर यांचा मोलाचा वाटा आहे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर मुंबई येथे हा पक्ष प्रवेश झाला आ. टारपे व अपक्ष जि. प. सदस्य अजित मगर या दोन्ही नेत्यांचा जनसंपर्क तगडा असल्याने येणार्या विधानसभेचे कळमनुरी मतदार संघाचे टिकीट कोणाला मिळणार हा विषय सध्यातरी गुलदस्त्यातच राहणार आसल्याने सध्यातरी कळमनुरीत शिवसेनेला अच्छे  दिन तर कोंग्रेस पक्षाच्या नेत्या प्रज्ञाताई सातव यांच्या साठी डोकेदुखीचा विषय ठरणार आहे. व शिवसेना नेते माजी खासदार. सुभाष वानखेडे यांची ताकत हिंगोली जिल्ह्यात वाढणार आशी चर्चा जनसामान्यातुन होतांना दिसत आहे.

Previous articleबाळापूर विधान सभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे ना पाठिंबा!
Next article🌹*माझी शाळा*🌹