Home Breaking News गणेशउत्सव आनंदात साजरा करा परंतु डी.जे.ला परवाना नाही…… अधिक्षक प्रमोद शेवाळे

गणेशउत्सव आनंदात साजरा करा परंतु डी.जे.ला परवाना नाही…… अधिक्षक प्रमोद शेवाळे

हिमायतनगर पोलीस ठाण्याला पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांची भेट

अंगद सुरोशे तालुका
प्रतिनिधी/हिमायतनगर| गणेश मंडळांनी पर्यावरण पूरक गणेशेत्सव साजरा करणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसेंदिवस पर्यावरण दूषित होत चालले असून, प्लास्टर ऑफ पॅरिस सारख्या वस्तूंपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीं पर्यावरणाला अडचणीत आणणारी आहेत. या मुर्त्या विसर्जन केल्याने जलसाठे प्रदूषित होत आहेत. या प्रदूषित झालेल्या पाण्याचे परिणाम भयंकर होत असून, येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागनार आहेत. त्यामुळे “प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण युक्त” आणि “गुलालापासून गुलाबाकडे” या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. असे आवाहन नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केले.

ते दि. २८ रोजी आगामी गौरी गणेशोत्सव शांततेत व कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून व्हावे. यासाठी हिमायतनगर पोलीस ठाण्याला सायंकाळी सात वाजता भेट दिल्यानंतर गणेश मंडळाच्या युवकांशी चर्चा करताना बोलत होते. या भेटीदरम्यान हिमायतनगर येथे हिंदू – मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध प्रश्नावर चर्चा झाली गणेश मंडळाची चर्चा करताना एसपी. प्रमोद कुमार शेवाळे यांनी सांगितले की, सर्वांना शासनाच्या नियमाचे पालन करून पर्यावरण पूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. तसेच छोट्या मुर्त्या मांडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित एक वेगळा संदेश देत नांदेड जिल्ह्यात हिमायतनगरचे नाव अव्वल क्रमांक वर आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केले.
यावेळी शहरातील वडार गल्लीत बनविण्यात येणाऱ्या बजरंग गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्याचा प्रश्नही उपस्थित झाला. मंडळाच्या वतीने पूर्वीच्या रूट बदलून मोकळ्या रस्त्याने परवानगी द्यावी अशी मागणी केली गेली. या मागणीला अनुसरून पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले कि, पूर्वीप्रमाणे ज्या मार्गाचा वापर होता त्याचा मार्गाने मिरवणूक काढावी लागेल. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची गणेश मंडळांनी खबरदारी घ्यावी. हा मार्ग बदलण्याचा अधिकार जिल्हास्तरीय समितीला आहे. यंदाचा उत्सव शांततेत पार पाडा आणि या रोड बदलण्याची कायदेशीर पद्धतीने मागणी करा. मागणीला अनुसार रस्ता बदलण्याचा निर्णय समिती घेऊन याबाबत मार्ग काढेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रसंगी पुढे बोलताना प्रमोद कुमार शेवाळे म्हणाले की, अनेकजण डीजे वाजवण्यास परवानगी मागत आहेत. परंतु डीजेवर सुप्रीम कोर्टानेच बंदी घातलेली असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत डीजे वाजविण्यास मान्यता देण्यात येणार नाही. गणेश उत्सव आनंदाने साजरा करताना याचे भान ठेवून सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गणेश मंडळाच्या परिसरात जेवढे चांगले उपक्रम राबविता येतील ते राबवावे. जे गणेश मंडळ पर्यावरण पूरक आणि चांगले उपक्रम राबवित त्यांना बक्षीस देण्यात येईल. याप्रसंगी शेतकरी नेते बाबुराव कदम कोहळीकर, माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर, गोपाल भाऊ सारडा, माजी जिल्हा परिषद सदस्य समाद खान, प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशीश सकवान, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान युसुफखान पठाण, माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद भाई, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, अन्वर खान, जावेद खतीब, गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस निरीक्षक बि.डी. भूसनूर, पोलीस कर्मचारी व पत्रकार मंडळी उपस्थित होते.

Previous articleगोर बंजारा तीज उत्सव समिती वाशी येथील तीज महोत्सव विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न!
Next articleबाळापूर विधान सभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे ना पाठिंबा!