Home Breaking News गोदामाई प्रतिष्ठान च्या वतीने नदी स्वच्छता अभियानाचा 18 वा आठवडा

गोदामाई प्रतिष्ठान च्या वतीने नदी स्वच्छता अभियानाचा 18 वा आठवडा

पूर परिस्थिति व श्रावण महिन्याच्या निर्माल्यान गोदावरी च्या प्रदुषणात मोठी वाढ

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

नाशिक मध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता, त्यामुळे गोदावरीच्या पात्राची वाढ होवुन मोठ्या प्रमाणात गोदावरी तिराच्या आजू बाजूच्या भा गातील कचरा व त्यातच श्रावण महिन्याचे व्रतवैकल्याचे निर्माल्य व धार्मिकविधी यामुळे गोदावरी नदीच्या प्रदुषणात मोठी वाढ झाली आहे.
त्यामुळे सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर व गोदावरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवार रोजी गोदावरी प्रतिष्ठाणची कार्यकारी अध्यक्ष सृष्टी देव च्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष आबा देव, भूमीराजा साप्तहिकाचे संपादक हेमंत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदस्य मयुर गायकवाड, गणेश पाखले, गैरी देव यांच्या सह गोदावरी नदी स्वच्छता अभियाण राबविण्यात आले.
यावेळी गोदावरी नदीपात्रात साठलेला कचरा, निर्माल्य, देवांचे नदीत टाकलेले फोटो यांची साफसफाई करुन तो कचरा एका ठिकाणी साठवून महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्याना बोलावून त्याची कायदेशीर विल्हेवाट लावण्यात आली.
गोदावरी प्रतिष्ठानच्या वतीने जे स्वच्छता अभियाण सातत्याने राबविले जात आहे, त्याचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

Previous articleपावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची खरीप पिके धोक्यात…..
Next articleगोर बंजारा तीज उत्सव समिती वाशी येथील तीज महोत्सव विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न!