हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
अहिल्यादेवी होळकर पुलावर मोठी वाहतूक कोंडी
नाशिक शहरातील अनेक ठिकणी वाहतूक कोंडीची समस्यानिर्माण होत असताना, त्यात आता गोदावरी नदी वरील होळकर पुलावरील चारचाकी वाहनांची अनाधिकृत पार्किंग ची नवीन भर पडली आहे. रविवार कारंजाकडून पंचवटी कारंजाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील होळकर पुलावर अनधिकृतरित्या चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जात आहे, त्यामुळे मोठी बाजार पेठ असलेल्या रविवार कारंजा येथील वाहतूक कोंडीवर अधिक दाब वाढला आहे.
गोदावरी नदीवर नवीन होळकर पुलावरील पादचारी रस्त्याच्या बाजूला एका रांगेत चार चाकी वाहने पार्क केल्या जात असल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूकीला ही वाहने अड़थळा ठरत आहे.
या पुलावर चारचाकी वाहने तर पार्क करतातच, पण बाहेर गावावरून पंचवटी येथे देवदर्शना साठी आलेल्या भावींकांना आणणाऱ्या ट्रांव्हल्सही पार्क केल्या जात आहेत. परंतु पोलिसांकडून यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. मात्र याचा हक़नाक त्रास कोंड़ीत सांपड़लेल्या नागरिकांना होतो आहे. त्यामुळे होळकर पुलावर पार्क होणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.