हिमायतनगर /-कृष्णा राठोड
तालुक्यातील वासी ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंचायत समिती व ग्रामपंचायत वाशीच्या संयुक्त विद्यमानाने वाशी येथील जंगलमध्ये ३०१झाडांचे वूक्षारोपण करण्यात आले आहे.
पर्यावरण संरक्षण हे माणसाला आनंदी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे त्या करिता वृक्षारोपण करून योगदान देणे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे असे – असे विचार वाशी येथील सरपंच सो.शिल्पाताई गुलाब राठोड यांनी प्रतिपादन केले आहे.
वृक्षारोपण करणे ही काळाची गरज प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षण करण्याचे प्रोत्सानही येथील सरपंचानी उपस्थित दिले.
वाशी येथील जंगलामध्ये ज्या ठिकाणी वृक्षांचे वृक्षतोड केली आहे अशा ठिकाणी ‘हरित टेकडी’ या संकल्पनेतून पंचायत समिती हिमायतनगर व ग्रामपंचायत वाशीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांमध्ये वाशी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
वृक्षारोपण करताना यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयुरकुमार अंदीलवाढ ही उपस्थित होते.
वृक्षारोपण करून त्यांचे संगोपनही चांगल्या करण्यासाठी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना, शिक्षक.उपस्थितना ही मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित गटविकास अधिकारी मयुरकुमार अंदिलवाड
वाशी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती.शिल्पाताई गुलाबराव राठोड, ग्रामसेवक, गुलाब राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.