Home Breaking News जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे तहसीलदार गायकवाड पुन्हा सेवेत रुजू!

जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे तहसीलदार गायकवाड पुन्हा सेवेत रुजू!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक:- 25 ऑगस्ट 2022

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारे हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान तहसीलदार डी.एन. गायकवाड सर हे प्रकृतीच्या कारणास्तव रजेवर गेले होते. गेले काही दिवस त्यांना डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितलं होता. काही दिवस आराम करुन ते दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी रुजु झाले आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या परीस्थितीची जाण, शांत, संयमी, अभ्यासपूर्ण उत्तर देण्याची क्षमता, मृदुभाषी असलेल्या तहसीलदार गायकवाड सर यांची हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी नेहमीच वाट पाहत होते. यावर्षी अतिवृष्टीने कहर केलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील सत्तापालटाने शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या प्रचंड होत्या. परंतु अद्याप लवकर शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळेल, की नाही अश्या संभ्रमात तालुक्यातील शेतकरी बांधव आहेत.
पण काहिही असो हिमायतनगर तहसिल कार्यालयातील जनतेच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी, तहसील कर्मचाऱ्यांना शिस्त आणि नियम लावण्यासाठी तहसीलदार गायकवाड सरांचे नांव आज सर्वसामान्य जनतेच्या मुखातून नेहमीच बाहेर येते. यात कुठलेही दुमत नाही.
हिमायतनगर तालुक्याचे गायकवाड डि.एन. यांनी पुन्हा एकदा पदभार स्वीकारल्यानंतर संबंध हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी, भुमीहिन, कष्टकरी, सर्वसामान्य जनता अत्यंत खुष असल्याचे चित्र एका शेतकऱ्याने बोलुन दाखवले आहे.

👉 हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी बेपत्ता….
गेल्या पंधरा दिवसांपासून उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय किनवट येथे आपला रीतसर रुजु अर्ज दाखल करून सुद्धा , आजतागायत हिमायतनगर तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांची खुर्ची रिकामीच दिसते. हेही वास्तव चित्र आहे. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्पाअंतर्गत काही ठराविक गांवाचा कालावधी, अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपला आहे. तालुक्यातील शेतकरी कमालीचा परेशान आहे. कारण गेल्या पंधरा ते विस दिवसांपासून हिमायतनगर तालुक्याचा तालुका कृषी अधिकारी हे रुजु नसल्याने, मी हिमायतनगर- हदगांव विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी भ्रमणध्वनीवर बोललो. माननीय आमदार महोदयांनी तुमची अडचण लगेच लक्षात घेतो. म्हणुन मला आश्वासन दिले होते. पण कुठे पाणी मुरते हाही प्रश्न संशोधनाचा विषय आहे. असो, कृषिप्रधान देशात हिमायतनगर तालुक्यात गेल्या विस दिवसांपासून तालुका कृषी अधिकारी रूजु होऊन, गैरहजर असेल, तर त्या हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांची अवस्था न विचारलेलीच बरी..
असा प्रश्न हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी विचारत आहेत.

Previous articleपद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची राज्यभर संघटनात्मक बांधणी करणार.
Next articleसर्जा राजांचा बैलपोळा हा सण थाटात साजरा होणार…..