मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 25 आॅगष्ट 2022
भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनीवासराव उर्फ बापूसाहेब बालाजीराव देशमुख गोरठेकर वय (७८) यांचे बुधवारी रात्री निधन झाले.
बापुसाहेब गोरठेकर यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांच्यावर नांदेड येथील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु यश आले नाही. रात्री १२:०५ च्या सुमारास त्यांचा ईसीजी काढण्यात आला. त्यांनंतर डॉ.रविंद्र बिलोलीकर यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकृत जाहीर केले. त्यांच्या पश्चात पं.सं. चे माजी सभापती शिरीषराव देशमुख, जिल्हा बॅंकेचे संचालक कैलास देशमुख ही दोन असुन दोन विवाहित मुली, बहिण, भाऊ, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. बापुसाहेब गोरठेकर यांच्या पार्थिवावर २५ आॅगष्ट रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्या मुळगावी गोरठा ता. उमरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
संरपंच पदापासून राजकीय प्रवास सुरू केलेल्या बापुसाहेब गोरठेकर यांनी करारी बाण्याने राजकीय क्षेत्रात नेहमीच दबदबा निर्माण केला. १९९७ ते २००४ या काळात जि.प. सदस्य म्हणून निवडून आले. ते जिल्हा परिषद चे अध्यक्ष ही होते.
त्यानंतर तीन वेळा सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेवर ते निवडून गेले. त्यानंतर बापुसाहेब गोरठेकर यांनी यांनी राजकीय क्षेत्रात आपली वेगळी छाप निर्माण केली. उमरी नगरपालिकेवर राकाँच्या माध्यमातून १५ वर्षे एकहाती सत्ता स्थापन केली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, उमरी खरेदी-विक्री संघ, उमरी सहकारी सोसायटी या संस्थावर त्यांनी वर्चस्व निर्माण केले. बापुसाहेब गोरठेकर यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. मार्गदर्शक नेतृत्वाला मुकलो- खा. चिखलीकरबापुसाहेब गोरठेकर आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी दिलेला शब्द हा प्रमाण मानल्या जात. शब्दास प्रचंड किंमत देणारा नेता आहे. बापुसाहेब गोरठेकर यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील जाणते विकासासाठी धडपडणारे नेतृत्व काळाच्या पड्याआड गेले आहे. एक मार्गदर्शनक, धुरंधर राजकारणी गमावला, अशी शोकभावना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली.