Home Breaking News सर्जा-राजाच्या साजाणे बाजारपेठ सजली

सर्जा-राजाच्या साजाणे बाजारपेठ सजली

अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनिधी

शेतकर्यां सोबत शेतीत वर्षभर राबणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा पोळा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतो यंदा पोळा शुक्रवारी आहे त्यामुळे हिमायतनगर बाजारात सर्जा राजासाठी लागणारे विविध साहित्य खरेदीसाठी आले आहेत.

बाजारात शेतकरी बांधव पोळा सणा करिता लागणारे साहित्य खरेदी करताना व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण खूप महत्त्वाचा आहे कारण शेतकरी बैलांच्या भरोशावर काळ्या मातीत राबतो.

त्यामुळे त्याच्या घरात अन्नधान्य येते, बैलाची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदेमळणी केली जाते. दुसऱ्या दिवशी पोळा हा सण मोठ्या उत्साहाने पार पडतो, पोळा या सणासाठी शेतकरी बांधव पैशाची जुळवाजुळव करून आवश्यक त्या साहित्याची खरेदी करताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण थोडे फार चांगले असल्याने शेतकर्‍यांच्या शेतातील पिकेही थोड्याफार प्रमाणात चांगली असल्याने बळीराजा पोळा सणा करीता लागणारे साहित्य खरेदी सढळ हाताने करीत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीच्या तुलनेत बैलांच्या साजांच्या किमतीत जिएसटीमुळे दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे मात्र लाडक्या सर्जा राजा समोर हि वाढ जास्त वाटत नसल्याचे दिसून येत आहे.

चौकट गोधन घटली
गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील चराई शेत्रात झपाट्याने घट झाली, त्याचा परिणाम शेतकर्‍यांच्या बांधावरील गोधनावर झाला. गोधनाची संख्या घटल्याने चांगल्या प्रतीची बैल देखिल शेतकऱ्यांकडे राहिले नाही. त्यातच बरेच शेतकरी आता तांत्रिक पद्धती शेती करीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यात बैल उरले नाही.

Previous articleअवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करून त्यावर कठोर कारवाई करा – उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती. अर्चनाताई पाटील
Next articleमाजी आमदार बापूसाहेब गोरठेकर काळाच्या पडद्याआड