Home Breaking News अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करून त्यावर कठोर कारवाई...

अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करून त्यावर कठोर कारवाई करा – उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती. अर्चनाताई पाटील

अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर हद्दपार

👉🏽शांतता कमिटीची बैठकी मध्ये दारूबंदी विषय चांगलाच गाजला……….

भूमीराजा न्यूज शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड -९१४५०४३३८१

हिमायतनगर /-तालुकयासह ग्रामीण भागातील सतत अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी श्रीमती अर्चनाताई पाटील यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला दिले आहे.
पोळा व गणेश उत्सव या दोन दिवस तालुक्यातील जेवढे ही अवैध दारू विक्रेते आहेत त्यांना पोलिस स्टेशनला आणून बसवण्याचे आदेशही स्थानिक पोलीस निरीक्षक बी. डि. भुसनूर यांना आदेश दिले आहे.
शांत बैठकीमध्ये या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत झाले आहे.
पोळा गणेशोत्सव या दोन दिवस तालुक्यासह ग्रामीण भागातील सर्व अवैध दारू विक्रेत्यांना पोलीस स्टेट्श येथे बसणार आहेत याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सर्व बीट जमादारांना आपल्या बीटमध्ये अवैध दारू विक्री कशी बंद करता येईल याकडे सर्वांनी लक्ष देने काळाची गरज आहे अशी सूचना देखील श्रीमती अर्चना पाटील यांनी बैठकीमध्ये बोलताना सांगितले आहे.

सार्वजनिक सण उत्सवामध्ये दारू विक्रेते व दारू पिणाऱ्या मुळेच भांजगडी होत अल्याचेही उपस्थितांना संबोधले.

Previous article‘ मुक्त ‘ विद्यापीठाचे पत्रकारिता अभ्यास केंद्र बंद
Next articleसर्जा-राजाच्या साजाणे बाजारपेठ सजली