– – – – तरीही द्वितीय वर्षासाठी विदयाथ्रीकडून शुल्क वसूल
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
नाशिक येथील महाराष्ट्र विद्यापीठातर्गत राबविण्यात येणारा पत्रकारिता पदव्युत्तर पद वी अभ्यासक्रमासाठीचे नाशिक शहरातील केंद्र बंद झाले आहे. कुठलेही महाविद्यालय हे केंद्र चालविण्या इच्छुक नसल्याने आता शहरातील 350 वर विद्यार्थी यांचा भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे अभ्यास केंद्रा चा पत्ता नसतानाही विद्यापीठाने एमए एमसीजे अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाचे शुल्क वसूल करत त्यांचे प्रवेश करुन घेतले आहे. भरलेले अर्ज केंद्रावर जमा करण्यासाठी विदयाथ्री गेले असता तेव्हा ही बाब उघड झाल्याने प्रचंड तणावात आले आहे. यावर विद्यापीठा कडून याबाबत समाधानकारक उत्तर दिले जात नसल्याचा आरोप केला जात आहे.
यावर कड़ी म्हणजे प्रथम वर्ष पुर्ण झालेल्याना दुसऱ्या वर्षासाठी अहमदनगर केंद्रात जाण्याचा अजब सल्ला दिला जात आहे.
प्रतिक्रिया -:हेमंत शिंदे( नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष )
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ
या आधी सुद्धधा बी. लीब. एम. लीब. अभ्याक्रमाच्या नाशिक सा र्वजनिक वाचनालय येथील अभ्यास केंद्र बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. अटी, शर्ती, नियमांच्या कसोटीत अभ्यास केंद्र बसत नसल्याचा दावा विद्यापीठ करीत असले तरी पर्यायी दुसरे केंद्र सुरु न करता पहिले एचपीटी कॉलेज मधील केंद्र बंद करुन विद्याथ्री वर अन्याय करुन त्याना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.
तरी विद्यापीठाने ताबड़तोब नवीन केंद्र सुरु करुन पत्रकारितेच्या विद्याथ्रीची होणारी ससेहोलपट थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.