अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनीधी
जिल्ह्यात श्री. गणेश उत्सव 31ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत डाॅल्बी /मालक/धारक /गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डाॅल्बी सिस्टिम उपयोगात आणण्यास प्रतिबंध आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी काढला आहे.जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 (1) अन्वये 31 ऑगस्ट रोजी गणेशाचे आगमन ते 9 सप्टेंबर श्रीचे विसर्जन या कालावधीत मिरवणुक संपेपर्यंत नांदेड जिल्ह्यात कोणत्याही डाॅल्बी डि.जे सिस्टीम वापरात आणु नये संबधीत डि. जे मालक धारक यांनी आपली मशीन सामग्री सीलबंद ठेवाव्यात हे आदेश 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत म्हणजे श्री च्या विसर्जना पर्यंत लागु राहतील या आवाजामुळे लहान मुले, वयोवृध जेष्ठ नागरिक, तसेच आजारी सामाण्य नागरीकांना यांना त्रास होणार नाही किंवा शांतता सुव्यवस्था यांना कुठलेही गालबोट लागणार नाही या अनुषंगाने हे आदेश काढतात आले आसल्याचे वृत्त आहे.